शाहूवाडी एमआयडीसी संदर्भात जनतेला विचारात घेण्याची गरज.आबासाहेब पाटील यांचे मत

0
12

सरूड. (प्रतिनिधी ) 

          शाहूवाडी तालुक्यात एमआयडीसी उभारण्यासाठी गेल्या अनेक वर्षापासून प्रयत्न केले जात आहेत, पण हे तालुक्यातील एमआयडीसीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी गेल्या दोन वर्षापासून आमदार व खासदार यांचे प्रयत्न चालू आहेत, त्याप्रमाणे एमआयडीसीसाठी शाहूवाडी पन्हाळ्याच्या हद्दीत डोनोली, आवळी येथे एमआयडीसी उभारण्यासाठी जागेची पाहणी करून तत्वता मंजुरी घेण्यात आली होती पण आवळी गावातील ग्रामस्थांनी जागा देण्यास विरोध केल्याने हा प्रश्न मागे पडला होता गेल्या दोन दिवसापासून आमदार विनय कोरे व खासदार धैर्यशील माने यांनी उद्योग मंत्री उदय सामंत यांची भेट घेऊन तालुक्यातील अंबर्डे, करंजोशी, सावे, बजागेवाडी येथे एमआयडीसीसाठी प्रस्ताव ठेवून चर्चा केली आहे. त्याप्रमाणे उदय सामंत यांनी संबंधित अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष पाहणी करून उपलब्ध जागेचा प्रस्ताव सादर करण्याचा आदेश दिला आहे.  

    शाहुवाडी तालुक्यात एमआयडीसीची स्वप्न साकार करावयाचे असल्यास शाहूवाडी तालुक्यातील जनतेचे मत जाणून घेण्याची गरज आहे. तरच एमआयडीसी करताना कोणत्याही प्रकारचा विरोध होणार नाही. ज्या ठिकाणी एमआयडीसी उभा करावयाची आहे त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांच्या जाणाऱ्या जागेच्या बदल्यात ठोसपणे शेतकऱ्याला मिळणाऱ्या फायद्याचा व यापासून परिसरात होणाऱ्या परिणामाची माहिती तालुक्यातील जनतेला एकत्र करून घेऊन सगळ्यांचे मत जाणून घेऊन एमआयडीसी उभारणी करावी तरच या एमआयडीसीला कोणते प्रकारचा विरोध होणार नाही. आणि एमआयडीसी चे स्वप्न साकार होईल असे मत भाजप नेते आबासाहेब पाटील यांनी व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *