वाशी जवळ समोरासमोर धडक.. एअर बॅग उघडली अन. जीवीतहानी टळली..

0
vasi

वाशी ता.करवीर येथे झालेल्या भीषण अपघातात दोन्ही गाड्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. 

हळदी. (प्रतिनिधी)   कोल्हापूर–परिते – गडहिंग्लज मार्गावर वाशी (ता. करवीर) गावाजवळ रविवारी दुपारी झालेल्या भीषण अपघातात बोलेरो आणि कार यांची समोरासमोर धडक झाली.   या अपघातात  बोलेरो गाडीमध्ये पाच प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नसून  दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

              कोल्हापूर – परिते – गडहिंग्लज या मार्गावर  वाशी बस स्थानक नजीक महिंद्रा बोलेरो  ही गाडी कोल्हापूरहून भोगावतिकडे चालली होती त्याचवेळी रस्त्यावरून जात असलेल्या जेसीबी ला ओव्हरटेक करत असताना भोगावतीहून कोल्हापूर कडे येणाऱ्या टॉयोटा एटिऑस कारची जोरदार धडक बसली. आणि बोलोरो गाडीचे पुढील उजव्या बाजूचे चाक तुटून बाजूला गेले, त्यामुळे गाडी रस्त्यावरच पलटी झाली या भीषण धडकेत बोलेरो गाडीतील चालकासह पाच प्रवासी होते. हे किरकोळ जखमी झाले या प्रवाशांना रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांनी गाडीतून बाहेर काढले आणि खाजगी दवाखान्यामध्ये उपचारासाठी दाखल केले.    धडक इतकी जोराची होती की दोन्ही गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अपघातानंतर काही काळ राज्यमार्गवरील  मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली. स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत. रस्त्यावरील वाहतूक सुरळीत केली या अपघाताची नोंद करवीर पोलिस ठाण्यात झाली आहे. एअर बॅग उघडल्याने जीवीतहानी टळली..   टॉयोटा एटिऑस कारमधील  एअर बॅगमुळे बचावले..  अपघात होताच कारमधील एअरबॅग ओपन झाल्या. यामुळे कारमधील सर्वांना सुरक्षा कवच निर्माण झाल्याने मोठी जीवितहानी टळली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *