खुपिरे येथे १६३ निरंकारी भक्तांचे उत्स्फूर्त रक्तदान

संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन, कोल्हापूर झोन अंतर्गत, शाखा खुपिरे
कोल्हापूर. (प्रतिनिधी) खुपिरे, ता.करवीर. येथे निरंकारी सद्गुरु माता सुदिक्षा जी महाराज यांच्या आदेशान्वये, संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन, कोल्हापूर झोन अंतर्गत, शाखा खुपिरे यांच्या वतीने संत निरंकारी सत्संग भवन, खुपिरे येथे घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरामध्ये १६३ निरंकारी भक्तांनी उत्स्फूर्त रक्तदान केले. संत निरंकारी मिशनचे झोनल इन्चार्ज श्री. अमरलाल निरंकारी यांच्या शुभहस्ते रक्तदान शिबिराचे उद्घाटन झाले. याप्रसंगी श्री अमरलाल निरंकारी म्हणाले की निरंकारी मिशन हे आध्यात्मिक विचारधारेबरोबरच सामाजिक कार्यातही अग्रेसर आहे. जसे आज या ठिकाणी रक्तदान शिबिर होत आहे. तसेच स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, रेल्वे स्टेशन वरचे स्वच्छता अभियान, महापुरामध्ये पूरग्रस्तांना मदत, कोरोनाग्रस्तांना मदत, असे विविधअंगी सामाजिक कार्य करत असते.
अमरलालजी पुढे म्हणाले की १९८० ला सुरु झालेली रक्तदान चळवळीची श्रृंखला अव्याहतपणे सुरू आहे. आत्तापर्यंत भारतवर्षामध्ये ३६ लाख २४ हजार पेक्षा अधिक निरंकारी अनुयायांनी रक्तदान केले आहे. त्याच श्रृंखलेचा आजचे हे रक्तदान शिबिर हा एक भाग आहे. याप्रसंगी संत निरंकारी सेवा दलाचे क्षेत्रीय संचालक श्री शहाजी पाटील, खुपिरे गावच्या सरपंच तृप्ती संजय पाटील, श्रीपती जाधव, डॉ. पांडुरंग नाकार्डे, शंकर चव्हाण व भागातील भाविक व नागरिक उपस्थित होते.
रक्तदान शिबिर छत्रपती प्रमिला राजे जिल्हा रुग्णालय यांच्या रक्तपेढीच्या निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. ट्विंकल खटवानी व केदार ढेकणे यांच्या मार्गदर्शनाखाली झाले. संत निरंकारी सेवादल, खुपिरे युनिटने नेटके नियोजन केले होते.