भोगावती साखर कारखान्यात सत्ताधारी आघाडीचा कारभार सभासद हिताचा: राहुल पाटील सडोलीकर

0
पाटील

 

देवाळे तालुका करवीर येथे सत्ताधारी आघाडीच्या सभासदांच्या बैठकीत बोलताना राहुल पाटील,दादा

हळदी  (प्रतिनिधी) :भोगावती सहकारी साखर कारखान्याने काटकसरीचा कारभार करत सभासद हिताची वाटचाल सुरू ठेवली असून, डिस्टलरी विस्तारीकरण व इथेनॉल, सहवीज प्रकल्प राबवून कारखाना कर्जमुक्तीच्या दिशेने वाटचाल करू असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पी. एन. पाटील (सडोलीकर) यांनी केले. देवाळे तालुका करवीर येथे सत्ताधारी आघाडीच्या सभासदांच्या बैठकीत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी गोकुळचे माजी संचालक पी डी धुंदरे होते.
        भोगावती साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रा. शिवाजीराव पाटील म्हणाले की, कारखान्याने काटकसरीच्या धोरणावर चालत सभासद हित जोपासले आहे. दराच्या बाबतीत इतर साखर कारखान्यांच्या बरोबरीने दर दिला आहे. भविष्यात उत्पादन क्षमता वाढवून डिस्टलरी विस्तारीकरण व इथेनॉल प्रकल्प राबवून कारखान्याचे कर्ज कमी केले जाईल. सभासदांना दीपावलीपूर्वी साखर व व्याजाची बिले दिली जाणार आहेत.भोगावतीकडे यंदा साडेपाच लाख टन ऊस गाळप करण्याचा संकल्प असून आतापर्यंत ७५० करार झाले आहेत. सर्व ऊस उत्पादकांनी कारखान्यास ऊस पाठवून सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
       भोगावती शिक्षण मंडळाचे अध्यक्ष दिगंबर मेडसिंगे म्हणाले की, शिक्षण मंडळाचा कारभार सर्वांच्या सहकार्याने सुरळीत सुरू असून, संस्थेची घटना दुरुस्ती करून सभासदांना दिलेले आश्वासन पाळले जाईल. या बैठकीस  क्रांतिसिंह पवार पाटील , शिवाजी पाटील (तारळे), गोकुळचे संचालक  बाळासाहेब खाडे, मोहन पाटील  वसंतराव पाटील (कंथेवाडी), भोगावतीचे माजी अध्यक्ष संजय पाटील, संदीप पाटील, शिवाजी तळेकर, शिवाजी कारंडे, 

तमाजी उपाध्यक्ष विश्वनाथ पाटील, राऊसो बुगडे आदींसह कारखान्याचे व शिक्षण मंडळाचे सर्व संचालक उपस्थित होते.  विठ्ठल महाडेश्वर, भिवाजी पाटील, पी. एस. पाटील, बंडोपंत पाटील वाडकर, बाबासाहेब देवकर, सागर चौगुले, आनंदराव मुगदोम, बाबासाहेब पाटील, जगन्नाथ पाटील यांनी मनोगते व्यक्त केली. भोगावतीचे माजी उपाध्यक्ष राजू कवडे यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *