डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील जयंतीनिमित्त शाहू कॉलेजच्यावतीने रॅली

कोल्हापूर.(प्रतिनिधी) येथील रयत शिक्षण संस्थेच्या राजर्षी छत्रपती शाहू कॉलेज व रोटरी क्लब ऑफ करवीर यांच्या वतीने पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३८ व्या जयंतीनिमित्त सोमवार दि.२२ रोजी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या रथाची मिरवणूक महाविद्यालयाच्या वतीने काढण्यात आली. यावेळी महाविद्यालयातील कर्मवीर भाऊराव पाटील आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यास मा. प्र. प्राचार्य, प्रो. डॉ. डी. आर. भोसले यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करून रॅलीची सुरुवात करण्यात आली. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून रोटरी क्लब ऑफ करवीरचे अध्यक्ष, मा. श्री. शीतल दुगे, सचिव मा. श्री. पंडित जाधव हे उपस्थित होते. महाविद्यालयातून ते शहरातील मध्यवर्ती बसस्थानकासमोर असणाऱ्या कर्मवीर अण्णांच्या पुतळ्यापर्यंत व नंतर परत महाविद्यालयात असे रॅलीचे नियोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांचे झांज पथक व शैक्षणिक संदेश देणारे विविध फलक हे रॅलीचे मुख्य आकर्षण होते.
महाविद्यालयाच्या वतीने प्रा. प्राचार्य, प्रो. डॉ. डी. आर. भोसले, न्यू कॉलेज प्राचार्य, डॉ. व्ही. एम. पाटील यांनी मध्यवर्ती बसस्थानकासमोर असणाऱ्या कर्मवीर अण्णांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. महाविद्यालयाचे प्रा. प्राचार्य, प्रो. डॉ. डी. आर. भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी रयत शिक्षण संस्थेचे लाईफ मेंबर प्रा. डी. एम. गायकवाड, आयक्युएससी प्रमुख डॉ. यु. बी. शेळके, उपप्राचार्या,प्रो. डॉ. पी. बी. पिस्टे, प्रो. डॉ. एम. बी. देसाई, प्रो.डॉ.एम., डॉ. ए. पी. उबाळे, ज्युनिअर विभागाच्या उपप्राचार्या, प्रा. एल. बी. चव्हाण, सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. डी. ए. माळवेकर, राष्ट्रीय छात्र सेनेचे प्रमुख कॅप्टन डॉ. आर. सी. पाटील, कार्यालयीन अधीक्षक श्री. बी. एम. शिंदे, सर्व विभागाचे विभागप्रमुख, विद्यार्थी, प्राध्यापक तसेच शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.