शिवाजी विद्यापीठ आंतरविभागीय कबड्डी स्पर्धेत रयतचे शाहू कॉलेज द्वितीय

अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य, प्रो. डॉ. डी. आर. भोसले सोबत विजयी संघ
कोल्हापूर. (प्रतिनिधी) शिवाजी विद्यापीठ क्रीडा संकुल, कोल्हापूर येथे संपन्न झालेल्या शिवाजी विद्यापीठाच्या आंतरविभागीय कबड्डी स्पर्धेत कदमवाडी येथील रयत शिक्षण संस्थेच्या शाहू कॉलेजने द्वितीय क्रमांक मिळविला आहे. यापूर्वी विभागीय पुरुष कबड्डी स्पर्धेत ह्या महाविद्यालयाने तृतीय क्रमांक मिळविला होता. या स्पर्धेचे उद्घाटन शिवाजी विद्यापीठ, क्रीडा विभाग प्रमुख डॉ. शरद बनसोडे यांच्या शुभहस्ते, के .एम .सी . कॉलेजचे प्राचार्य डॉ . बी . एन . उलपे यांच्या विशेष उपस्थितीत करण्यात आले. ह्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य, प्रो. डॉ. डी. आर. भोसले होते. या स्पर्धेत कोल्हापूर, सांगली व सातारा विभागातील अव्वल अशा एकूण १२ संघांनी सहभाग सहभाग नोंदवला.
त्यापैकी आण्णासाहेब डांगे महाविदयालय,हातकणंगले यांनी प्रथम क्रमांक, राजर्षी छत्रपती शाहू कॉलेज, कोल्हापूरने द्वितीय क्रमांक, नाईट कॉलेज, इचलकरंजीने तृतीय क्रमांक व सरदार बाबासाहेब माने महाविद्यालय, रहिमतपूरने चतुर्थ क्रमांक पटकावला. या स्पर्धेचे बक्षीस वितरण प्रा. आयुब कच्छी यांच्या हस्ते झाले. यावेळी कोल्हापूर जिल्हा कबडडी असोशिएशनचे कोषाध्यक्ष प्रा. आण्णासो गावडे, के . एम . सी .कॉलेजचे प्राचार्य डॉ. बी. एन. उलपे उपस्थित होते.
या खेळाडूंना प्रा. संभाजी पाटील,आंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक डॉ . रमेश भेंडीगिरी यांचे मार्गदर्शन लाभले. त्याच्या यशाबद्दल मा. सरोज पाटील (माई), महाविद्यालय विकास समितीच्या चेअरमन व रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी सदस्या सौ. संगीता पाटील, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य व रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी सदस्य मा. प्रशांत पाटील (दादा) , महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य, प्रो. डॉ. डी.आर. भोसले यांनी अभिनंदन केले आहे. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख डॉ. जी. एम लवंगारे, शारीरिक शिक्षण संचालक डॉ . विक्रमसिंह नांगरे, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.