रोटरी क्लबचा रास दांडिया सोहळा उत्साहात संपन्न

लोटस बॅंक्वेट हॉल येथील चैतन्यमय वातावरण
कोल्हापूर.(प्रतिनिधी). रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर या अग्रगण्य सामाजिक संस्थेतर्फे मंगळवार, दि. २३ सप्टेंबर २०२५ रोजी “रास दांडिया” हा भव्य सोहळा उत्साहात पार पडला. नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम सायंकाळी ६ ते १० वाजेपर्यंत लोटस बॅंक्वेट हॉल, मार्केट यार्ड, कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आला.
कोल्हापूरकरांनी पारंपरिक दांडिया रास उत्साहात आणि आनंदात साजरा केला. सोबतच सांस्कृतिक कार्यक्रम, खाद्यपदार्थांचे स्टॉल्स आणि मनोरंजनाचे विविध उपक्रम यांचा मनसोक्त आनंद घेतला. विविध गटांसाठी ठेवलेल्या १.७५ लाख रुपयांपर्यंतच्या आकर्षक बक्षिसांचे वितरण विजेत्यांना करण्यात आले. सुप्रसिद्ध निवेदिका तेजू कोंडूसकर यांनी प्रभावी सूत्रसंचालन केले, तर शरद शाह यांचा मेलडी ऑर्केस्ट्राने रसिकांना मंत्रमुग्ध केले.
यंदाचा सोहळा रोटरीच्या “Unite for Good” या संकल्पनेशी जोडलेला होता. सामाजिक बांधिलकी जपत क्लबने गरजू रुग्णांसाठी मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी ५१,०००/- रुपयांपर्यंत मदत जाहीर केली.सोहळ्याचे उद्घाटन रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रोटेरियन अरुण भंडारे यांच्या हस्ते झाले. अध्यक्ष प्रदीप कारंडे यांनी सर्वांचे आभार मानले, तर इव्हेंट चेअर जयेश गांधी आणि शरद तोतला यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य केलेल्या सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. या कार्यक्रमात रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर पुरस्कृत रोटरी समाज सेवा केंद्राच्या उपक्रमांचा व्हिडिओ डीजी अरुण भंडारे यांच्या हस्ते प्रदर्शित करण्यात आला.
सोहळ्यास रोटरी सदस्य, त्यांच्या कुटुंबीय तसेच कोल्हापूरकर बहुसंख्येने उपस्थित होते. या सोहळ्याचे प्रायोजक : मुख्य प्रायोजक – फेरोफेक्स, एस. एस. रिटेल, एव्हरेस्ट प्लाय, उपप्रायोजक – साई सर्व्हिस, सहप्रायोजक – चिपडे सराफ, वामाज साडी, किचन प्लस, महेंद्र ज्वेलर्स, कॅफे मेव्हरीक, डॉ. रेश्मा चरणे, श्री. श्याम नोतानी, श्री. प्रताप कोंडेकर