श्री. एम.टी. पाटील पतसंस्थेस १३.७५ लाखाचा नफा.

श्री.एम.टी.पाटील नागरी सहकारी पतसंस्थेच्या २५ वि वार्षीक सर्वसाधारण सभेत बोलताना संस्थेचे मुख्य प्रवर्तक डॉ. प्रदीप पाटील
टोप.(प्रतिनिधी) नवनवीन योजना,आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ग्राहकाभिमुख सेवा सुरू केल्याने एम. टी. पाटील पतसंस्थेस १३लाख ७५ हजाराचा नफा झाल्याची माहिती पतसंस्थेचे मुख्य प्रवर्तक व पचायत समितीचे माजी सभापती डॉ. प्रदीप पाटील यांनी दिली. ते श्री.एम.टी.पाटील नागरी सहकारी पतसंस्थेच्या २५ वी वार्षीक सर्वसाधारण सभेत बोलत होते. सभेच्या अध्यक्षस्थानी चेअरमन सौ. प्रविना पाटील या होत्या.
स्वागत व अहवाल वाचन सचिव अकबर आत्तार यांनी केले. अत्याधुनिक आशा स्वमालकीची इमारतीत सभा घेण्यात आली. यावेळी सभासद शिवराज विद्या मंदिरच्या मुख्याध्यापिका सौ. संध्या पाटील यांना आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार मिळालेबद्दल पंडीत पोवार यांच्या हस्ते करण्यात आला. आदर्श शिक्षक पुरस्कार हणमंत पोवार यांना जाहिर झाले बद्दल डॉ. प्रदीप पाटील यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. तर लेखाधिकारी एस.के.पाटील यांचा सत्कार ही करण्यात आला.यावेळी के.बी.पाटील,चंद्रकांत पाटील, यांनी संस्थेचा प्रगतीचा आढावा घेतला. सभासदानी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्यात आली.डॉ.प्रदीप पाटील पुढे म्हणाले सभासदाचे हित जोपसत अनेक विविध योजना राबविण्या चा मानस व्यक्त केला.
यावेळी सभेस व्हा.चेअरमन इंद्रजित लोहार संचालक पंडीत पोवार, दौलतराव पाटील, पोपट पाटील, अमोल भोसले, अमोल पाटील, अशोक भोसले, विजय दिंडे, संदीप सिसाळ, उमेश बामणे, चंद्रकांत पाटील, सचिन पाटील, अक्षय पाटील, हणमंत पोवार, पृथ्वीराज पाटील, शंकर वागवे, आनंदराव गायकवाड, रोहित वरुटे, महेश भोसले, डॉ.प्रिती पाटील, केतन पाटील, अभिजित गायकवाड, नामदेव मिरजकर सभासद आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.आभार पोपट पाटील यांनी मानले.