शाहू कॉलेज कदमवाडी येथे लाठी- काठी प्रशिक्षण शिबिर संपन्न

महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य, प्रो. डॉ. डी. आर. भोसले यांनी सहभागी विद्यार्थिनीना मार्गदर्शन केले.
कोल्हापूर.(प्रतिनिधी) रयत शिक्षण संस्थेचे, राजर्षी छत्रपती शाहू कॉलेज, कदमवाडी कोल्हापूर हे महाविद्यालय विद्यार्थ्यांच्यासाठी सातत्याने विविध उपक्रम राबवत असते. आधुनिक काळाशी निगडीत नव्या विषयांचा प्रारंभ करण्याबरोबरच विद्यार्थ्यांना स्वरक्षणाचे धडे देण्यात अग्रेसर ठरले आहे. मुलींनी सक्षम व्हावे व स्व संरक्षण करावे यासाठी नवरात्रीनिमित्त चार दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात ज्यु. कॉलेज ते एमएस्सी पर्यंतच्या विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या. दि. २४ ते २७ सप्टेंबर २०२५ ह्या कालावधी महाविद्यालयाच्या लेडीज हॉस्टेल समिती, महिला सक्षमीकरण समिती आणि सह्याद्री प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या शिबिराची आज सांगता झाली.
याप्रसंगी महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य, प्रो. डॉ. डी. आर. भोसले यांनी सहभागी विद्यार्थिनीना मार्गदर्शन केले. त्यांनी आपल्या मार्गदर्शनात मुलींनी आपल्या या गौरवशाली वारशाची जपणूक करण्याचे आवाहन केले. लाठी- काठी प्रशिक्षण शिबिर प्रशिक्षक सह्याद्री प्रतिष्ठानचे राजेंद्र बाळासो काटकर व सई प्रदीप थोरवत यांनी ह्या समारोपप्रसंगी लाठीकाठीचे विविध प्रकार, डोळे झाकून पट्ट्याने लिंबू कापणे इ. कौशल्याने प्रदर्शन केले. सह्याद्री प्रतिष्ठानचे सचिव, श्री. प्रवीण उबाळे यांनी विविध शस्त्रांची माहिती दिली. विद्यार्थिंनीने हे प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केल्याबद्दल मा. सरोज पाटील (माई), महाविद्यालय विकास समितीच्या चेअरमन व रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी सदस्या सौ. संगीता पाटील, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य व रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी सदस्य मा. प्रशांत पाटील (दादा) , महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य, डॉ. डी.आर. भोसले यांनी विद्यार्थिनीचे अभिनंदन केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महिला सक्षमीकरण समितीच्या प्रमुख प्रा. पी. डी. पुदाले यांनी केले तर प्रा. डॉ. मनीषा पाटील यांनी प्रशिक्षण शिबिराबाबत माहिती दिली. कार्यक्रमाचे आभार प्रा. एस. पी. मुलाणी यांनी व्यक्त केले. याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य, डॉ, ए. पी. उबाळे, प्रो. डॉ. पी. बी. पिस्टे, डॉ. एस. सी. खोले, डॉ. करीम मुल्ला, डॉ. अनुभूती पाटील, प्रा. शामल मुरकर व विविध वर्गाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.