सांगली जिल्ह्यातील काँग्रेस सेवा दल संघटनेचे कार्य उल्लेखनीय- सुरेश शेंडगे
राहुल गांधी, सोनिया गांधी व मल्लिकार्जुन खरगे यांचा आगामी सांगली दौऱ्याच्या यशस्वीतेसाठी बैठकीत चर्चा
सांगली (प्रतिनिधी)
काँग्रेस भवन सांगली येथे सांगली जिल्ह्यातील काँग्रेस सेवा दलाच्या प्रमुख पदाधिकारी कार्यकर्त्याची बैठक पार पडली. यावेळी सांगली जिल्हा काँग्रेस सेवा दलाचे एन ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष म्हणून धनाजी जाधव व सांगली शहर जिल्हा काँग्रेस सेवा दलाच्या कार्याध्यक्षपदी अनिल देवदास मोहिते यांची निवड झाल्याबद्दल प्रदेश काँग्रेसचे आदरणीय सुरेश आबा शेंडगे यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना सुरेश आबा शेंडगे यांनी सांगली जिल्ह्यामध्ये काँग्रेस सेवा दल ही संघटना अत्यंत उल्लेखनीय कार्य करीत आहे. येणाऱ्या काळामध्ये लोकसभेसारखे विधानसभा निवडणुकीमध्ये आपले योगदान द्यावे आणि काँग्रेसच्या आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी आपण प्रयत्न करावे असे सांगितले.
यावेळी काँग्रेस सेवा दल जिल्हाध्यक्ष अजित ढोले यांनी जिल्ह्यामधील प्रत्येक तालुक्यामध्ये काँग्रेस सेवा दल संघटना ही मजबूत झाली आहे. आज मिरज कवठेमंहकाळ, जत या तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. बुधवार 28 ऑगस्ट रोजी कडेगाव येथे सकाळी कडेगाव, पलूस, खानापूर, आटपाडी, विटा शहर या तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे. 5 सप्टेंबर रोजी काँग्रेस पक्षाचे देशाचे नेते आदरणीय राहुलजी गांधी आदरणीय सोनियाजी गांधी अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय मल्लिकार्जुन खरगे यांचा संयुक्त दौरा यशस्वी करण्यासाठी सेवा दल कार्यकर्ते यांनी तयार राहावे याचप्रमाणे येणाऱ्या विधानसभा निवडणूक मध्ये सांगली जिल्ह्यातील काँग्रेस व महाविकास आघाडीच्या उमेदवारासाठी आपण प्रचार यंत्रणा राबवावी असे आवाहन त्यांनी आपल्या मनोगत मध्ये व्यक्त केले. यावेळी जिल्हा संघटक अल्लाबक्श मुल्ला, ॲड. अर्जुनसिंह कोकाटे, ॲड. कुमार बलभीम पाटील, जिल्हा संघटक पोपट पाटील, विठ्ठलराव काळे, शैलेंद्र पिराळे, शमशाद नायकवडी, सीमा कुलकर्णी, मंगल भगत, सौ. मायाताई आरगे, वसंतराव आरगे, मीना शिंदे, तुकाराम पाटील, साहेबराव भोसले पाटील, संजय पाटील, जयसिंगराव सावंत इत्यादी मान्यवर उपस्थित होते.