शाहूवाडी तालुक्यातील मान आरोग्य केंद्रात ‘स्वस्थ नारी सशक्त परिवार’ अभियान संपन्न

सरूड.(प्रतिनिधी) शाहूवाडी स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानांतर्गत महिलांनी आपली काळजी घ्यावी ग्रामीण भागामध्ये महिलांच्यासाठी स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान अत्यंत महत्त्वाचे असून महिलांनी याबाबत आपले आरोग्य तपासणी करून घेऊन सशक्त राहावे ग्रामीण भागातील महिलांच्यासाठी अतिशय चांगला उपक्रम असून आरोग्याची काळजी घेणार आहे. असे प्रतिपादन भाजप कार्यकारिणीचे सदस्य व शेतकरी जन आक्रोश मोर्चाचे प्रमुख आबासाहेब पाटील यांनी केले ते माण तालुका शाहूवाडी येथे आरोग्य सेवा केंद्र बाबत सेवा पंधराव्या अंतर्गत स्वस्थ नारी सशक्त परिवारांना अभियांतर्गत कार्यक्रमात बोलत होते.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर व राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या माध्यमातून शासनाच्या विविध सेवा योजना आणि आरोग्य केंद्रात लागणारे साहित्य डॉक्टर व कर्मचाऱ्यांच्या साठी निवासी याबाबत पाठपुरावा केला जाईल यावेळी बहुसंख्य रक्तदात्यांनी रक्तदान केले आरोग्य केंद्रातल्या वस्तूंचा पाठपुरावा करून आपणास मिळवून देतो महिलांनी आपल्या आरोग्याची काळजी घेऊन माण (ता. शाहूवाडी) येथे सेवा पंधरवडा आणि स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान अंतर्गत कार्यक्रमाचे आयोजन शाहुवाडी तालुका आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले होते.
शाहूवाडीतील माण येथील आरोग्य सेवा केंद्र येथे सेवा पंधरवडा आणि स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान अंतर्गत प्रारंभी कार्यक्रमाचे उदघाटन भाजप नेते व शेतकरी जनआक्रोश मोर्चाचे प्रमुख आबासाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. मौजे माण तालुका शाहूवाडी जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी सेवा पंधरवडा म्हणून स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानांतर्गत महिलांसाठी आरोग्य शिबीर आणि रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
माण. तालुका – शाहूवाडी, जिल्हा – कोल्हापूर येथे झालेल्या सेवा पंधरवडा व स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानांतर्गत महिलांसाठी आरोग्य सेवेत आणि रक्तदान शिबीर यशस्वीपणे पार पडले. यावेळी उपस्थितीत प्रमुख पाहुण्याने आरोग्य शिबिर व रक्तदान शिबिर पाहाणी करण्यात आली या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाहुवाडी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एच. आर. निरंकारी हे होते. यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य केंद्रातील डॉक्टर, आरोग्य सेवक, आशा सेविका,कर्मचारी वर्ग प्रास्तविक व आभार अमर पाटील यांनी केले .
कार्यक्रमास माण सरपंच संजय पाटील, जिल्हा अध्यक्ष संजय पाटील, बापूसाहेब नवाळे, प्रकाश काळे, विक्रम केसरे, विकास कांबळे, डॉ एच आर निरंकारी, डॉ उत्तम बर्गे, डॉ मंजित परब, डॉ सोनल सातपुते, डॉ तेजस्वी माने, नितिन भोसले अजित पाटील प्रशांत कुंभार अब्दूल मन्यार, संगिता कांबळे संगिता पाटील, विनिता खेगे पौर्णिमा कांबळे, प्रणती खारवते, निलम पटेल आदी उपस्थित होते.