भेडसगाव येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात निदर्शने.

प्राथमिक आरोग्य केंद्र येथे निदर्शने करताना माजी सरपंच अमरसिंह पाटील, माजी सभापती दिलीप पाटील यांच्यासह उपस्थित कार्यकर्ते.
सरूड. (प्रतिनिधी) भेडसगाव तालुका- शाहुवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे माजी सरपंच अमरसिंह पाटील व माजी सभापती दिलीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज निदर्शने करण्यात आली. कोतोली पैकी धनगरवाडी येथील साखराबाई बाबुराव कोळपटे यांच्या प्रसूतीच्या वेळी येथील कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे लहान मुलाचा मृत्यू झाला होता. या संदर्भातील चौकशीसाठी आज निदर्शने करण्यात आली.
यावेळी बोलताना अमरसिंह पाटील म्हणाले सदरच्या घटनेची चौकशी होऊन संबंधित कुटुंबाला न्याय मिळावा, खाजगी दवाखान्याचा संबंधित कुटुंबाला आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. याला जबाबदार कोण? यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर एच आर निरंकारी म्हणाले संबंधित घटनेबाबत निवेदन प्राप्त झाले असून वरिष्ठांच्या मार्फत चौकशी करू.
यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर तेजश्री एकशिंगे म्हणाल्या आम्ही व आमच्या टीमने योग्य ती पेशंटची काळजी घेऊन पुढील उपचारासाठी 108 ॲम्बुलन्स मार्फत आरोग्य सेवा दिली गेली आहे.
याबाबत 23 तारखेला तहसीलदार यांना व वैद्यकीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले होते. याबाबत कोणती कारवाई केली यासाठी आज निदर्शन आयोजित केले असल्याचे अमरसिंह पाटील यांनी यावेळी सांगितले. यावेळी संजय पाटील, बाबुराव कोळापटे, नरेंद्र गायकवाड, अजित पाटील, शरद पाटील, सागर पाटील; विक्रम पाटील आधी सहकार्यकर्ते उपस्थित होते.