रयत शिक्षण संस्थेचे शाहू कॉलेज कदमवाडी येथे अविष्कार संशोधन स्पर्धा संपन्न

अविष्कार स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी न्यू कॉलेजचे भूगोल विभागप्रमुख डॉ. आर. व्ही. भास्कर
कोल्हापूर. (प्रतिनिधी) विद्यार्थ्यांच्यामध्ये संशोधनात्मक दृष्टिकोन वाढीस लागावा ह्या हेतूने शिवाजी विद्यापीठ व रयत शिक्षण संस्थेच्या मार्गदर्शक सुचनेनुसार महाविद्यालयात संस्थात्मक पातळीवरील अविष्कार संशोधन स्पर्धा संपन्न झाली. ही स्पर्धा कला भाषा आणि साहित्य ललित कला, वाणिज्य व्यवस्थापन आणि कायदा, शुद्ध विज्ञान, कृषी आणि पशुधन, अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान व वैद्यकीय आणि औषधनिर्माण अशा सहा विषयात ही स्पर्धा संपन्न झाली.
ह्या स्पर्धेचे उद्घाटन न्यू कॉलेजचे भूगोल विभागप्रमुख डॉ. आर. व्ही. भास्कर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. ह्या स्पर्धेच्या परीक्षणासाठी न्यू कॉलेजचे वनस्पतीशास्त्र प्रमुख डॉ. एन. व्ही. पवार व डॉ. एन. डी. पाटील महाविद्यालय मलकापूरच्या वाणिज्य विभागाच्या विभागप्रमुख डॉ. एस. एस. लवेकर ह्या उपस्थित होत्या. ह्या स्पर्धेमध्ये विविध महाविद्यालयाच्या विविध विषयाच्या ७८ विद्यार्थ्यांनी आपले नाविन्यपूर्ण संशोधन प्रकल्पाचे सादरीकरण केले. यातील प्रत्येक वर्गवारीतील दोन प्रकल्प निवडले जाणार आहेत.
याप्रसंगी विज्ञान विभागाचे उपप्राचार्या, प्रो. डॉ. पी. बी. पिस्टे, डॉ. एम. बी. देसाई, डॉ. ए. पी. उबाळे, अंतर्गत हमी कक्षाचे प्रमुख डॉ.यु. एस. शेळके, इ. मान्यवर उपस्थित होते. ही संशोधन स्पर्धा यशस्वी करण्यासाठी वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख व महाविद्यालयाच्या आविष्कार कमिटीचे प्रमुख डॉ. शकील शेख यांनी विशेष परिश्रम घेतले.