बहुजनांच्या शैक्षणिक प्रयोगाचे जनक कर्मवीर भाऊराव पाटील : उमेश सूर्यवंशी

रयत शिक्षण संस्था भविष्याचे नेतृत्व करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
रयत शिक्षण संस्थेचे, राजर्षी छत्रपती शाहू कॉलेज, कोल्हापूर येथे रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांची १३८ वी जयंती
कोल्हापूर. (प्रतिनिधी) समाजातील दीनदुबळ्यात्या अठरापगड जातीच्या लोकांच्या झोपडीपर्यंत ज्ञानाचा प्रकाश घेवून जाण्याचे काम कर्मवीर भाऊराव पाटील यांनी केले. कर्मवीरांचा हा शैक्षणिक प्रयोग तत्कालीन महाराष्ट्रासाठी वस्तुपाठ होता. असे मत कोल्हापुरातील परिवर्तनवादी चळवळीतील सक्रिय कार्यकर्ते, भारतीय कम्युनिस्ट पक्ष व अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कृतिशील भागीदार साथी उमेश सूर्यवंशी यांनी व्यक्त केले. ते रयत शिक्षण संस्थेचे, राजर्षी छत्रपती शाहू कॉलेज, कोल्हापूर येथे रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३८ व्या जयंतीचे औचित्य साधून आयोजित केलेल्या विशेष व्याख्यानात बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेचे उच्च शिक्षण विभागाचे सहसचिव प्रिं. डॉ. शिवलिंग मेनकुदळे हे होते.
रयत ही संकल्पना सर्व संप्रदाय, वर्ण व जात याच्या पलीकडे जाणारी, सर्वहारा वर्गाचे प्रतिनिधित्व करणारी आहे. आजवर महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांनी ह्या शब्दालाला एक मूल्याचे रूप दिले. म्हणूनच कर्मवीरांचे योगदान लक्षात घेवून सरकारने त्यांना भारतरत्न किताब देवून त्यांच्या कार्याचा गौरव करावा असे मत ही मा. उमेश सूर्यवंशी यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रिं. डॉ. शिवलिंग मेनकुदळे यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात छ. शाहू, म. फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार पुढे घेऊन जाण्याचे काम रयत शिक्षण संस्था करीत असल्याचे नमूद केले. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी काळाची पाऊले ओळखून ज्या तऱ्हेचे संस्थात्मक कार्य केले. त्या मार्गाने आज रयत शिक्षण संस्था वाटचाल करीत आहे.
कृत्रिम बुद्धिमत्तेचे शिक्षण, माजी विद्यार्थी नोंदणी, इंटरॅक्टीव पॅनेल, संशोधन पत्रिका ह्या संस्थात्मक पातळीवर उपक्रमाचा त्यांनी आढावा घेतला. या सर्व उपक्रमातून रयत शिक्षण संस्था भविष्याचे नेतृत्व करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
याप्रसंगी शिवाजी विद्यापीठाचे प्र.कुलगुरू प्रो. डॉ. पी. एस. पाटील, रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडीच्या सदस्या, मा. सरोज पाटील (माई), महाविद्यालय विकास समितीचे व रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य मा. विक्रांत पाटील, मा. सौ. दिपाली तायवडे पाटील, महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य, प्रो. डॉ. डी. आर. भोसले , रयत शिक्षण संस्थेचे लाईफ मेंबर प्रा. डी. एम. गायकवाड, आयक्युएससी प्रमुख डॉ. यु. बी. शेळके, उपप्राचार्या,प्रो. डॉ. पी. बी. पिस्टे, प्रो. डॉ. एम. बी. देसाई, डॉ. ए. पी. उबाळे, ज्युनिअर विभागाच्या उपप्राचार्या, प्रा. एल. बी. चव्हाण, कार्यालयीन अधीक्षक श्री. बी. एम. शिंदे व सर्व विभागाचे विभागप्रमुख, विद्यार्थी, प्राध्यापक तसेच शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व प्रमुख पाहुण्याचे स्वागत प्रा. डी. ए. माळवेकर यांनी केले. तर सूत्रसंचालन प्रा. जे. ए. कांबळे यांनी व आभारप्रदर्शन डॉ. एस. सी. खोले यांनी केले.