आरपी आय करवीर तालुका अध्यक्ष पदी अशोक घाडगे

सांगरुळ. (प्रतिनिधी) रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गटाच्या करवीर तालुका अध्यक्ष पदी अशोक बापु घाडगे (सांगरुळ) यांची निवड झाली आहे. निवडीचे पत्र जिल्हाध्यक्ष पांडुरंग नामदेव कांबळे ( कुरुकलीकर) जिल्हा सरचिटणीस भीमराव दौलत कांबळे (सरवडे) व कार्याध्यक्ष आर एस कांबळे अशोक घाडगे यांना नुकतेच दिले आहे.
अशोक घाडगे हे गेली अनेक वर्षे आरपीआय पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणून करवीर तालुक्यात सामाजिक काम करत आहेत त्यांच्या कामाची दखल घेऊन ही निवड करण्यात आली असल्याचे अध्यक्ष पांडुरंग कांबळे यांनी सांगितले. रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. राजेंद्र गवई यांच्या निवृत्तीखाली संघटनाचे कार्य करणार असल्याची ग्वाही अशोक घाडगे यांनी यावेळी दिली.