मनपा जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेमध्ये कमला कॉलेजचा संघ उपविजेता

प्राचार्या तेजस्विनी मुडेकर, उपप्राचार्य मोहन जाधव, लेफ्टनंट ज्योती लेंगरे, पूजा ठाकूर यांचे मार्गदर्शन लाभले
कोल्हापूर. (प्रतिनिधी) जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, कोल्हापूर यांचे वतीने आयोजित विभागीय क्रीडा संकुल, संभाजीनगर, कोल्हापूर येथे झालेल्या मनपा जिल्हास्तरीय 19 वर्ष मुली कबड्डी स्पर्धेमध्ये कमला कॉलेजच्या कनिष्ठ विभागातील कबड्डी संघ उपविजेता ठरला आहे. या स्पर्धेमध्ये उपांत्य फेरीचा सामना शांतीनिकेतन यांच्यासोबत पाच गुणांच्या फरकाने जिंकला व अंतिम सामना विवेकानंद कॉलेज सोबत झाला.
कमला कॉलेजच्या कबड्डी संघामध्ये कर्णधार बन्सरी पटेल, गिरीजा विभुते, गौरी जाधव, श्रुती चौगुले, नम्रता उंटवाले, तेजस्वीनी व्हनमोरे, प्रणाली ढाले, सेजल चव्हाण, दिपाली कांबळे, प्राची गोसावी, प्रिया जावळीकर, नेहा साठे या खेळाडूंचा समावेश होता. या संघातील बन्सरी पटेल व गिरीजा विभूते या दोन खेळाडूंची कोल्हापूर विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या खेळाडूस ताराराणी विद्यापीठाचे अध्यक्ष डॉ. क्रांतिकुमार पाटील, सचिव प्राजक्त पाटील, प्राचार्या तेजस्विनी मुडेकर, उपप्राचार्य मोहन जाधव, लेफ्टनंट ज्योती लेंगरे, पूजा ठाकूर यांचे मार्गदर्शन लाभले