कवलापूरला विमानतळ करा, सांगली नेहमीच ऋणी राहील ; मंत्री मोहोळ यांना पृथ्वीराज पाटील यांच्याकडून साकडे

0
IMG-20251012-WA0250

सांगली (प्रतिनिधी – विनायक क्षीरसागर)

सांगली शहर आणि जिल्ह्याच्या विकासाला गती देण्यासाठी विमानतळ गरजेचे आहे. कवलापूर विमानतळाचा प्रस्ताव आता टप्प्यात आला आहे. त्याला दिल्लीतून साथ दिला. येथे विमानतल करा, सांगली नेहमी तुमची ऋणी राहील, अशा शब्दांत भाजप नेते पृथ्वीराज पाटील यांनी केंद्रीय नागरी वाहतूक मंत्री मुरलीधर मोहोळ यांना साकडे घातले.

मुंबई येथे मोहोळ यांची भेट घेऊन कवलापूर विमानतळाविषयीचे निवेदन दिले. त्यावेळी येथील परिस्थिती, शेतमाल उत्पन्नातील वैविध्य, कार्गो विमानतलाला असलेल्या संधी, नागरी वाहतूकीला चालना देण्यासाठी असलेले वैद्यकीय नगरी व गलई व्यवसायाचे बलस्थान याबाबत त्यांनी चर्चा केली. त्याला श्री. मोहोळ यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

ते म्हणाले, ‘‘कवलापूर हद्दीतील १६५ एकर क्षेत्र विमानतळ विकासाचा प्रस्ताव आता ऐरणीवर आला आहे. सांगली जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने कवलापूर येथे विमानतळ गरजेचे आहे. येथील जमिन आधुनिक काळातील विमानतळासाठी अपुरी पडते, मात्र आवश्यक क्षेत्र द्यायला शेतकरी तयार आहेत. कृषी आणि उद्योग विकासाला त्यातून बळ मिळणार आहे. त्यासाठी ‘कार्गो’ विमानतळ मंजूर करणे गरजेचे आहे. मुंबईत नुकत्याच झालेल्या बैठकीत पालकमंत्री चंद्रकांत पाटील, उद्योग मंत्री उदय सामंत यांनी कवलापूर विमानतळाबद्दल सकारात्मक चर्चा केली आहे. महाराष्ट्र विमान प्राधीकरण आणि केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाने याबाबत सकारात्मक साथ द्यायला हवी. महाराष्ट्रातील एक उमदे नेतृत्व दिल्लीत या खात्याचे मंत्रीपद भूषवत आहे. कवलापूर विमानतळ आपणच मंजूर केल्यास सांगली सदैव ऋणी राहील. सांगलीच्या इतिहासात गौरवाने याचा उल्लेख होईल.’’

मिरजेचे आमदार सुरेश खाडे, सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ आणि कवलापूर विमानतळ बचाव कृती समितीचे निमंत्रक पृथ्वीराज पवार यांच्यासह अनेकांचा या विषयावर प्रयत्न सुरु आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न सामान्य माणसाने विमान प्रवास करावा, असे आहे. त्याला बळ द्यावे, अशी अपेक्षा श्री. पाटील यांनी व्यक्त केली. त्याला श्री. मोहोळ यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *