मिरज प्रभाग ३ मध्ये आ. डॉ. सुरेश खाडे यांच्याहस्ते १ कोटी ४५ लाखांच्या कामांचा शुभारंभ
मिरज (प्रतिनिधी)
मिरज प्रभाग क्रमांक ३ मध्ये आ. डॉ. सुरेशभाऊ खाडे यांच्या विशेष पाठपुराव्यातून मंजूर झालेल्या विविध विकासकामांचा आज नागरिकांच्या उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला. या विकासकामांमध्ये रस्ते सुधारणा, डांबरीकरण, सिमेंट कॉक्रीट रस्ते, सभामंडप व उद्यान विकास अशी विविध कामे समाविष्ट आहेत. एकूण १ कोटी ४५ लाख रुपयांच्या कामाचे उदघाटन पार पडले. अण्णाभाऊ साठे योजना, नगरोत्थान योजना आणि आमदार फंड या अंतर्गत आ. सुरेश खाडे यांनी निधी मंजूर करून आणला होता.
प्रभाग क्र. ३ मधील डांबरीकरण व रस्ता सुधारणा (३२ लाख ९३ हजार), रानभरे बोळ कॉक्रीट करणे (८ लाख), शिंदे बोळ कॉक्रीट करणे (८ लाख), साईनंदन पार्कजवळील घरकुल म्हाडा कॉलनीतील सिमेंट कॉक्रीट रस्ते (११ लाख), रमा उद्यान येथे गणपती मंदिर सभामंडप बांधकाम (२५ लाख), आदर्श कॉलनी (भिंताडे घर ते शिंदे घर) रस्ता सुधारणा (१० लाख), पंढरपूर रोड (माने घर ते वारकरी भवन) रस्ता सुधारणा (१५ लाख), गोसावी गल्ली, जिजामाता चौक येथील सभामंडप विकास (१० लाख), नितिन देशमाने घर ते मेघानी घर रस्ता सुधारणा (१० लाख) या कामांचा शुभारंभ करण्यात आला.
या सर्व कामांमुळे प्रभाग क्रमांक ३ मधील नागरिकांना दर्जेदार मूलभूत सुविधा उपलब्ध होणार असून मिरज शहराच्या विकासाला गती मिळेल, असा विश्वास आ. डॉ. सुरेश खाडे यांनी व्यक्त केला. नागरिकांच्या सहकार्याने आणि प्रशासनाच्या समन्वयातून प्रभागाचा सर्वांगीण विकास साधण्यास आम्ही कटिबद्ध आहोत, असेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी युवा नेते सुशांत खाडे, भाजप पूर्व मंडळ अध्यक्ष चैतन्य भोकरे, भाजप पश्चिम मंडळ अध्यक्षा सौ. अनिता हारगे, माजी स्थायी समिती सभापती सुरेश बापू आवटी,माजी नगरसेवक पांडुरंग कोरे, गणेश माळी, दिगंबर जाधव, निरंजन आवटी, संदीप आवटी, अजित दोरकर, भाजप जिल्हा उपाध्यक्ष शशिकांत वाघमोडे, भाजप जिल्हा चिटणीस बाबासाहेब आळतेकर, सचिन जाधव, माजी महापौर संगीता खोत, विनायक यादव, अजिंक्य हंबर, विलास मोरे यांच्यासह भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते, परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


