कोल्हापूरचे सर्किटबेंच पश्चिम महाराष्ट्राच्या विकासाची दिशा बदलेल  …..अँड. नरवणकर

0
कोल्हापूरचे सर्किटबेंच पश्चिम महाराष्ट्राच्या विकासाची दिशा बदलेल

 कोल्हापूर.(प्रतिनिधी) महावीर मध्ये “सर्किट बेंच  आणि कोल्हापूरचे अर्थकारण” या विषयावर एकदिवसीय कार्यशाळा  संपन्न , शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर अग्रणी महाविद्यालय योजनेअंतर्गत महावीर महाविद्यालयातील अर्थशास्त्रच्या विभागाच्या वतीने कोल्हापूर येथे  नुकत्याच स्थापन झालेल्या सर्किट बँक च्या पार्श्वभूमीवर  सर्किट बँक आणि कोल्हापूरचे अर्थकारण या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

              मुंबई च्या विकासामध्ये जेवढे महत्त्व मुंबई उच्च न्यायालयास होते तेवढेच महत्त्व पश्चिम महाराष्ट्राच्या विकासामध्ये कोल्हापूरच्या सर्किट बेंच चे सुद्धा असेल. कोल्हापूर सह पश्चिम महाराष्ट्राच्या विकासाच नेतृत्व कोल्हापूरचे सर्किट बेंच करेल असे प्रतिपादन  कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी ॲड यू.पी.नरवणकर  ज्येष्ठविधीज्ञ  मुंबई उच्च न्यायालय    यांनी केले.    सर्किट बेंच साठी आवश्यक पायाभूत सुविधा जलद गतीने पूर्ण  करण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घ्यावा असे अध्यक्ष भाषणातून मा.ॲड. अभिजीत कापसे साहेब यांनी सुचवले .                                                     

             या कार्यशाळेचे स्वागत आणि प्रस्ताविक प्राचार्य डॉ.अद्वैत जोशी यांनी केले. प्रमुख पाहुणे व मान्यवरांची ओळख डॉ संजय ओमासे यांनी  करून दिली.या कार्यशाळेत  डॉ. एम एस देशमुख, अधिष्ठता मानव्यशास्त्र  शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर प्राचार्या डॉ वर्षा व्ही.मैंदर्गी  डॉ. सीए श्रीकांत बच्चे यांचे उपस्थित त्यांना मार्गदर्शन लाभले . या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माधवी रसाळ यांनी केले. कार्यक्रमाचे आभार डॉ सुजाता पाटील यांनी मांडले.  या कार्यशाळेसाठी प्रा. सयाजी हुंबे ,प्रा. मानसिंग पाटील तसेच अर्थशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *