आदमापूरचा सतेज पाटील ‘ झाला ‘राजपत्रित अधिकारी’..!
एमपीएससी’ परीक्षेत सतेज पाटीलचे यश : राज्यात प्राप्त केली ७५ वी रँक
मुदाळ तिट्टा( प्रतिनिधी ) जिद्द ,चिकाटी आणि महत्वकांक्षेला प्रयत्न व अभ्यासाच्या सातत्याची जोड असेल तर कमी वयात देखील यशाला गवसणी घालता येते.हे दाखवून दिले आहे.आदमापूर ता.भुदरगड येथील सतेज सुरेश पाटील या विद्यार्थ्याने. त्याने नुकत्याच जाहीर झालेल्या राज्य लोकसेवा आयोग परीक्षेच्या (एमपीएससी) निकालामध्ये राज्यात ७५ व्या रँक ने उत्तीर्ण होत ‘राजपत्रित अधिकारी या पदावर यशाची मोहर उमठवली आहे. त्याचे स्वप्न तो सत्यात उतरण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत राज्य लोकसेवा आयोग (एमपीएससी) ची जोरदार तयारी सुरु ठेवली.दररोज दहा-बारा तास तो सातत्याने अभ्यास करत आपल्या स्वप्नांना आकार देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत राहिला.
सतेजचे पहिली ते पाचवी चे प्राथमिक शिक्षण टिक्केवाडी येथील शाळेत झाले. सहावी ते दहावी माध्यमिक शिक्षण प.बा पाटील माध्यमिक विद्यालय मुदाळ तालुका भुदरगड.अकरावी, बारावी पुणे या ठिकाणी झाले तसेच बीएसीचे शिक्षण यशवंतरावकॉलेज सोळांकूर येथे झाले.
स्वप्न पुर्ण झाल्याने त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. या यशामागे शिक्षक , आई-वडील , नातेवाईक यांचे सहकार्य लाभले.
स्पर्धेत टिकून रहा
जीवनात यश-अपयश येतच असते,मात्र खचून न जाता स्पर्धेत सयंम ठेवत टिकून राहिले पाहिजे. जोपर्यंत तुमच्या मनाच्या आतून आल्याशिवाय यशाला गवसणी घालता येत नाही.अशा भावना आपल्या मनोगतातून त्यांनी व्यक्त केल्या .


