रविवारी देशातील सर्वात मोठी बैलगाडी शर्यत व श्वान थरार:- पै. चंद्रहार पाटील

0
IMG_20251106_150819

 

 

कवठेमहांकाळ प्रतिनिधी 

   मणेराजुरी ( ता. तासगाव) येथील कोड्याच्या माळावर देशातील सर्वात मोठी बैलगाडी शर्यत व श्वान शर्यतीचे रविवारी (ता. ९) सकाळी सात रात्री दहा वाजेपर्यंतआयोजन करण्यात आले आहे. बैलगाडी शर्यत संघटने तर्फे शिवसेनेचे पहिले अधिवेशन होत आहे. देशातील सर्वात बैलगाडी शर्यतीस शिवसेनेचे पक्षप्रमुख, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासह अन्य नेतेमंडळी उपस्थित राहणार आहेत. ‘श्रीनाथ केसरी ‘ किताब सन्मानित करण्यात येणार आहे. अशी माहिती संयोजक डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांनी दिली.

    येथील कुस्ती संकुलामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी संवाद पत्रकारांशी साधला. यावेळी हिंदकेसरी संतोष वेताळ, अतुल भोसले प्रतिष्ठान चे अध्यक्ष आनंदराव मोहिते, ॲड. सुमित गायकवाड, अतुल भिसे, अभिजित सुर्वे प्रमुख उपस्थितहोते.

   पै. पाटील म्हणाले, गोवंश संवर्धनासाठी गेली चार-वर्षांपासून बैलगाडी शर्यतीचेआयोजन केले जाते. मणेराजुरी येथे चौथी बैलगाडी शर्यत होत आहे. बैलगाडी शर्यतीमुळे गोवंश संवर्धनामध्ये वाढ झाली आहे. बैलांच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. लाखो रुपये किंमती वाढल्या आहेत. राज्यातील सर्व बैलगाडी मालक उपस्थित राहतील.

चौकट 

बैलगाडी शर्यत संघटने तर्फे शिवसेनेचे अधिवेशन होत आहे. श्रीनाथ केसरी’ चे आयोजन केले आहे.अधिवेशनास शिवसेना नेते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे, उद्योग मंत्री उदय सामंत, आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्यासह मंत्री, आमदार उपस्थित राहणार आहेत.

—-

बैलगाडी व श्वान शर्यतीला दोन फॉरन्युचिअर, दोन थार गाड्या, सात ट्रॅक्टर, १५० दुचाकी गाड्या बक्षीसे देण्यात येणार आहेत.बैलगाडी शर्यती पाहण्यास येणाऱ्या बैलगाडी शैकिनांसाठी बैठकीचे व्यवस्था केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *