मिरजेत पुणे विभाग शिक्षक परिषदेचा मेळावा

0
IMG_20251108_121749

सांगली प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद पुणे विभाग व सांगली जिल्हा ग्रामीण तसेच महानगरपालिका क्षेत्र यांच्या वतीने पुणे विभाग शिक्षक मतदारसंघातील महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या सदस्य शिक्षकांचा निर्धार मेळावा रविवारी मिरज येथे होणार असल्याची माहिती माजी शिक्षक आ. भगवानराव साळुंखे व पुणे विभागीय कार्याध्यक्ष राजेंद्र नागरगोजे यांनी दिली.

या मेळाव्यास पश्चिम महाराष्ट्रातून शिक्षक उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. मेळाव्यास शिक्षक परिषदेचे प्रांत अध्यक्ष वेनुनाथ कडू, कार्यवाह राजकुमार बोनकिले, कोषाध्यक्ष राजेंद्र सूर्यवंशी, माजी आ. ना. गो. गाणार, माजी आ. भगवानराव साळुंखे, पुणे विभागाचे अध्यक्ष सुरेश राठोड, उपाध्यक्ष विजयकुमार माने, कार्यवाह बाळासाहेब चोपडे, कोषाध्यक्ष आदम मुजावर, ए. बी. एस. आर. एमच्या सहप्रमुख प्रा. डॉ. सुजाता कुलकर्णी, सर्व प्रांत कार्यकारिणी सदस्य, सांगली जिल्हा ग्रामीण व महापालिका क्षेत्र कार्यकारिणीतील सर्व पदाधिकारी, सदस्य, सर्व तालुकाध्यक्ष व सदस्य उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्यात संघटनेतील पदाधिकारी मार्गदर्शन करणार आहेत. यामध्ये पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ विधान परिषद निवडणूक, शिक्षक मतदार नोंदणी, शिक्षक परिषद सभासद नोंदणी मोहीम, शिक्षकांसमोरील आव्हाने, शिक्षकांच्या समस्यांचे संकलन व निवारण, शाळा वाचवा देश वाचवा अभियान तसेच शिक्षण क्षेत्राचा संबंध नसलेल्या धनदांडग्या इच्छुकांना शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत रोखणे याबाबत मेळाव्यात चर्चा व मार्गदर्शन होणार आहे. यावेळी बजरंग शिंदे, महानगर अध्यक्ष नवनाथ लाड, संघटनमंत्री बाळासाहेब कणके यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *