शित्तूर – वारुण जिल्हा परिषद मतदार संघांसाठी विजय खोत तर पंचायत समितीसाठी अश्विनी पाटील यांना उमेदवारी
शित्तूर – वारुण जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक २०२५
शित्तूर-वारुण ( प्रतिनिधी) संपूर्ण शाहूवाडी तालुक्याचे लक्ष लागून राहिलेल्या शित्तूर – वारुण जिल्हा परिषद आणि पंचायत समिती मतदार संघांचे उमेदवार माजी आमदार सत्यजित पाटील ( सरूडकर ), जिल्हा बँकेचे संचालक रणवीरसिंह गायकवाड,शेतकरी कामगार पक्षाचे भाई भारत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर.
मालेवाडी (तालुका – शाहूवाडी) येथे दि. 7 नोव्हेंबर 2025 रोजी शिवसेना (उबाठा) चे माजी आमदार सत्यजित पाटील, जिल्हा बँक संचालक रणवीरसिंह गायकवाड,शेकाप चे नेते भाई भारत पाटील यांनी शित्तूर- वारुण पंचायत समिती आणि जिल्हा परिषद मतदार संघांसाठी आपल्या गटाच्या उमेदवारांची घोषणा केली. यावेळी वारणा आणि कानसा खोऱ्यातील कार्यकर्त्यांसह, तालुक्यातील असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
शित्तूर – वारुण जिल्हा परिषद मतदारसंघ सर्वसाधारण पुरुष आणि पंचायत समिती मतदारसंघ सर्वसाधारण स्त्री असे आरक्षण जाहीर झाल्यापासून माजी आमदार सत्यजित पाटील, रणवीरसिंह गायकवाड आणि भाई भारत पाटील गटाची उमेदवारी कोणाला मिळणार यांची उत्सुकता कार्यकर्त्यांमध्ये होती. या उमेदवारीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिले होते. जिल्हा परिषदेसाठी उमेदवार म्हणूनशित्तूर – वारुण जिल्हा परिषद मतदार संघांसाठी विजय खोत तर पंचायत समितीसाठी अश्विनी पाटील यांना उमेदवारी. गेली वीस – पंचवीस वर्ष शाहूवाडी तालुक्याच्या राजकारणात काम करत असताना प्रत्येक गाव, आणि वाडीवस्तीवरील तळागाळातील सर्वसामान्य माणसा पर्यंत पोचून, त्याच्या प्रत्येक सुखः दुःखात कार्यरत असल्यामुळे, अडी – अडचणीला धावून येणारा नेता, प्रशासकीय यंत्रनेची उत्तम प्रकारे हाताळणी करणारा कार्यकुशल प्रशासक अशी ओळख असणारे विजय खोत यांची उमेदवारी जाहीर झाल्यामुळे कार्यकर्त्यांनमध्ये उत्सहाचे वातावरण निर्माण झाले.
गत निवडणुकीत अगदी निसटत्या पराभवाला सामोरे जावे लागलेल्या भीमराव पाटील ( सोंडोलीकर )यांच्या पत्नी विद्यमान सरपंच अश्विनी पाटील यांची उमेदवारी पंचायत समितीसाठी जाहीर झाल्याने सदर निवडणुकीमध्ये पराभवाचा वचपा काढून विजयश्री खेचून आणण्यासाठी सर्वतोपारी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी बोलताना अनेक कार्यकर्त्यांनी सांगितले.
नेत्यांच्या अस्तित्वाची आणि कार्यकर्त्यांच्या अस्मितेची लढाई असलेल्या या निवडणूकित मतदार राजा कोणाला झुकतं माप देतोय, आणि कोणाला नाकारतोय हे पाहणं औत्सुक्याचे ठरेल.


