प्रा. डॉ. दिलीप गाडे यांना राष्ट्रीय स्तरावरील गरुड झेप पुरस्कार
कवठेमहांकाळ प्रतिनिधी
येथील पद्मभूषण वसंतरावदादा पाटील महाविद्यालयामधील भूगोल विभागाचे विभाग प्रमुख प्रा. डॉ. दिलीप गाडे यांना ईगल फाउंडेशन यांच्यावतीने राष्ट्रीय स्तरावरील गरुड झेप पुरस्कार – २०२५ देण्यात आला. हा पुरस्कार पद्मश्री दादा इदाते, माजी मंत्री डॉ. अण्णासाहेब डांगे, डी. वाय. पाटील शिक्षण समूहाचे विश्वस्त सूर्यकांत तोडकर, ऑल इंडिया धनगर समाज, महासंघाचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे, उद्योजक मनोहर सारडा सांगली यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले.
डॉ. गाडे यांचे महाविद्यालयातील शैक्षणिक, सांस्कृतिक व विद्यार्थी विकास विभागाचे कार्य तसेच इतर सामाजिक कार्याबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. पुरस्काराचे वितरण मान्यवरांच्या हस्ते रविवार दिनांक ९ नोव्हेंबर २०२५ रोजी डॉ. अण्णासाहेब डांगे इंजिनिअरिंग कॉलेज आष्टा, जि. सांगली येथे नुकतेच करण्यात आले. डॉ. गाडे यांना पुरस्कार मिळाल्याने सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे


