मिरजेत शिंपी समाजाचा “योगायोग” वधु-वर मेळावा उत्साहात
मिरज (प्रतिनिधी-विनायक क्षीरसागर)
नामदेव समाजोन्नती परिषद अंतर्गत सांगली-मिरज-कुपवाड शहर शाखा आणि समस्त शिंपी समाज यांच्या वतीने आयोजित १९ वा ” योगायोग ” वधू-वर मेळावा मिरजेत पटवर्धन हॉल मध्ये रविवार दि.९ रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या मेळाव्यास समाजातील इच्छुक वधू-वर आणि पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन सहभाग घेतला.
समस्त नामदेव शिंपी समाजाच्या १९ व्या ” योगायोग ” वधू-वर मेळाव्याचे उदघाटन नामदेव समाजोन्नती परिषदेचे पुणे-कोल्हापूर विभागाचे अध्यक्ष राजन उरुणकर यांच्यासह ज्येष्ठ समाजसेवक व उद्योजक अशोक कोपार्डे, मिरजेतील सामाजिक कार्यकर्ते व श्री नामदेव मंदिर मिरजचे अध्यक्ष सचिन सदाशिव पिसे, परिषदेचे सांगली विभागाचे केंद्रीय विश्वस्त ॲड. अनिल कोपार्डे व बाळासाहेब काकडे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. यावेळी परिषदेचे सां.मि.कु. शहर शाखा अध्यक्ष प्रा. डी.जी. धट (सर) आणि माजी अध्यक्ष अविनाश कृष्णाजी पोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ. माधुरी चोपडे यांनी केले. तर उपस्थितांचे स्वागत सुनील पोरे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय ॲड. अनिल कोपार्डे यांनी करून दिला. त्यानंतर प्रमुख पाहुणे राजन उरुणकर यांनी मार्गदर्शन केले. सचिन पिसे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना शिंपी समाजातील उपवर वधू-वरांसाठी परिषदेच्या वतीने सुरु असलेले हे काम अतिशय मोलाचे असून समाजाकडून मिळत असलेला प्रतिसाद देखील समाधानकारक असल्याचे सांगितले.
अशोक कोपार्डे यांनी या कार्यक्रमात उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्याचबरोबर महिला अध्यक्षा सौ. रुपाली गुजर, अजय गुजर, धट सर यांनी आपली मनोगते व्यक्त केली. आभार सुनील पोरे यांनी मानले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सौ. माधुरी चोपडे यांनी केले. मेळाव्यास सुमारे ७०० ते ८०० समाज बांधव व भगिनी इच्छुक वधू-वरांसह उपस्थित होते. इच्छुकांपैकी १५ ते २० तरुण-तरुणींनी व्यासपीठावर येऊन आपला परिचय करून दिला व आपल्या अपेक्षा व्यक्त केल्या.


