सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या ७८ जागांसाठी आरक्षण जाहीर ; अनेक मात्तबरांना धक्का

0
smkc

मिरज (प्रतिनिधी)

सांगली-मिरज-कुपवाड महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारांची उत्सुकता असलेली प्रभाग आरक्षण सोडत अखेर जाहीर झाली आहे. एकूण २० प्रभाग आणि ७८ वॉर्डांसाठी ही आरक्षण प्रक्रिया पार पडली. यामध्ये चार माजी महापौरांसह अनेक अनुभवी माजी नगरसेवकांच्या वॉर्डांमध्ये मोठे बदल झाले असून त्यांना सोडतीत अनपेक्षित धक्का बसला आहे. मिरज येथील बालगंधर्व नाट्य मंदिरात महापालिका आयुक्त सत्यम गांधी यांच्या हस्ते ही आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली.

सोडतीनंतर ४ माजी महापौर व अनेक माजी नगरसेवकांच्या वॉर्डांचे आरक्षण बदलले आहे. संगीता खोत, कांचन कांबळे, मैनुद्दीन बागवान, गीता सुतार, संगीता हारगे, अनिता वनखंडे, आनंदा देवमाने, शिवाजी दुर्वे, मनोज सरगर, योगेंद्र थोरात, विष्णू माने, जगनाथ ठोकळे, अजिंक्य पाटील, हरिदास पाटील, विनायक सिंहासने, सुबराव मद्रासी यांचे वॉर्ड नव्या आरक्षणामुळे बदलले आहेत. या बदलांमुळे अनेक वॉर्डांची गणिते बदलणार असून येत्या निवडणुकीची रणनीती ठरवताना सर्व उमेदवारांना नवी आखणी करावी लागणार आहे.

आरक्षणाचे स्वरूप (७८ वॉर्डांमध्ये):
अनुसूचित जाती प्रवर्ग: ११ जागा
त्यापैकी ६ जागा अनुसूचित जाती महिलांसाठी राखीव

अनुसूचित जमाती प्रवर्ग: १ जागा
यावेळी एसटी महिलांसाठी आरक्षण उपलब्ध नाही

मागासवर्गीय प्रवर्ग (एनटी/ओबीसी): २१ जागा
त्यापैकी ११ जागा महिलांसाठी आरक्षित

सर्वसाधारण प्रवर्ग: ४५ जागा
त्यापैकी २२ जागा सर्वसाधारण महिलांसाठी राखीव

प्रभाग निहाय आरक्षण-
महापालिका सांगली..प्रभाग क्रमांक आणि प्रभागातील आरक्षण पुढीलप्रमाणे
प्रभाग क्रमांक 1

1 अ : अनुसूचित जाती
1 ब : नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
1 क : सर्वसाधारण महिला
1 ड : सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक 2
2 अ : अनुसूचित जाती
2 ब : नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
2 क : सर्वसाधारण महिला
2 ड : सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक 3

3 अ : नागरिकांचा मागास प्रवर्ग
3 ब : सर्वसाधारण महिला
3 क : सर्वसाधारण महिला
3 ड : सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक 4

4 अ : अनुसूचित जाती महिला
4 ब : नागरिकांचा मागास प्रवर्ग
4 क : सर्वसाधारण महिला
4 ड : सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक 5

5 अ : नागरिकांचा मागास प्रवर्ग
5 ब : सर्वसाधारण महिला
5 क : सर्वसाधारण महिला
5 ड : सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक 6

6 अ : अनुसूचित जाती
6 ब : नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
6 क : सर्वसाधारण महिला
6 ड : सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक 7

7 अ :नागरिकांचा मागास प्रवर्ग
7 ब : सर्वसाधारण महिला
7 क : सर्वसाधारण महिला
7 ड : सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक 8

8 अ :नागरिकांचा मागास प्रवर्ग
8 ब : सर्वसाधारण माहील
8 क : सर्वसाधारण
8 ड : सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक 9

9 अ :नागरिकांचा मागास प्रवर्ग
9 ब : सर्वसाधारण महिला
9 क : सर्वसाधारण महिला
9 ड : सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक 10

10 अ : नागरिकांचा मागास प्रवर्ग
10 ब : सर्वसाधारण महिला
10 क : सर्वसाधारण महिला
10 ड : सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक 11

11 अ : अनुसूचित जाती महिला
11 ब : नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
11 क : सर्वसाधारण
11 ड : सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक 12

12 अ :नागरिकांचा मागास प्रवर्ग
12 ब : सर्वसाधारण महिला
12 क : सर्वसाधारण महिला
12 ड : सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक 13

13 अ : अनुसूचित जाती महिला
13 ब : नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
13 क : सर्वसाधारण
13 ड : सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक 14

14 अ : नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
14 ब : सर्वसाधारण महिला
14 क : सर्वसाधारण
14 ड : सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक 15

15 अ : अनुसूचित जाती
15 ब : नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
15 क : सर्वसाधारण महिला
15 ड : सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक 16

16 अ : नागरिकांचा मागास प्रवर्ग
16 ब : सर्वसाधारण महिला
16 क : सर्वसाधारण महिला
16 ड : सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक 17

17 अ : अनुसूचित जाती महिला
17 ब : नागरिकांचा मागास प्रवर्ग
17 क : सर्वसाधारण महिला
17 ड : सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक 18

18 अ : अनुसूचित जाती महिला
18 ब : नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
18 क : सर्वसाधारण
18 ड : सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक 19

19 अ : अनुसूचित जाती
19 ब : नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
19 क : सर्वसाधारण महिला
19 ड : सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक 20

20 अ : अनुसूचित जाती महिला
20 ब : नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
20 क : नागरिकांचा मागास प्रवर्ग
20 ड : सर्वसाधारण महिला
20 इ : सर्वसाधारण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *