वैभवकाका यांच्या वाढदिवसातून नवीन उर्जा घेऊया – वीरधवल नायकवडी

0
WhatsApp Image 2025-11-13 at 11.15.31 AM

वाळवा (प्रतिनिधी)

पद्मभूषण क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी हुतात्मा किसन अहिर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष वैभव नायकवडी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कारखाना कार्यस्थळावर बैठक संपन्न झाली. बैठकीस वैभवकाका नायकवडी सत्कार समितीचे प्रमुख वीरधवल नायकवडी यांच्या प्रमुख उपस्थितीत, कारखान्याचे व्हा. चेअरमन यांच्या अध्यक्षतेखाली हुतात्मा शिक्षण व उद्योग समूहातील पदाधिकारी, अधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

या वेळी वीरधवल नायकवडी म्हणाले, “२०१६ पासून विविध कारणांमुळे वाढदिवस मोठ्या प्रमाणात साजरा करता आला नाही. मात्र यावर्षी २१ नोव्हेंबर २०२५ रोजी सांस्कृतिक, क्रीडा, सामाजिक, सहकार, शिक्षण व आरोग्य क्षेत्रातील कार्यकर्त्यांच्या सहभागातून वाढदिवस साजरा करून सर्वांना नवीन उर्जा देऊया.”

प्रा. बाळासाहेब नायकवडी म्हणाले, वैभव नायकवडी यांनी पद्मभूषण डॉ. नागनाथअण्णा नायकवडी यांच्या विचारांनी प्रेरित होऊन सहकार, शिक्षण, क्रीडा व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून नव्या उमेदीने कामाला लागूया. प्रा. राजा माळगीसर यांनी सांगितले, काटकसर, गुणवत्ता आणि विश्वासार्हता या त्रिसूत्रीवर आधारलेले त्यांचे कार्य आदर्श आहे. या मूल्यांना बळकटी देण्यासाठी आपण सर्वांनी या कार्यक्रमात सक्रिय सहभाग घ्यावा.

शिवाजी पाटील म्हणाले, वैभवकाका हे आदर्श विद्यार्थी, उत्कृष्ट खेळाडू आणि शेतकरी-कामगारांच्या जीवनात आनंद निर्माण करणारे व्यक्तिमत्त्व आहे. २१ नोव्हेंबर हा आपणा सर्वांचा प्रेरणादिवस आहे.बैठकीत कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी १८ समित्या स्थापन करण्यात आल्या. यावेळी विविध संस्थांचे पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक मुकेश पवार यांनी केले, तर आभार कार्यकारी संचालक एस. एन. पाटील यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *