आयडियल स्मार्ट स्कूलमध्ये ‘आलेख्या’, स्मार्ट मार्ट व फन फेअर उत्साहात

0
WhatsApp Image 2025-12-21 at 9.26.40 AM (1) (1)

मिरज (प्रतिनिधी)

आदर्श शिक्षण मंडळ संचलित आयडियल स्मार्ट स्कूल (सीबीएससी विभाग) मिरज येथे शिक्षक व विद्यार्थ्यांच्या संयुक्त सहभागातून ‘आलेख्या – भारतीय पारंपरिक कला’, स्मार्ट मार्ट आणि फन फेअर या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. याचे नियोजन इयत्ता सहावी ते नववीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत शिस्तबद्ध व नियोजनबद्ध पद्धतीने केले.

शाळेच्या मल्टीपर्पज हॉलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ‘आलेख्या – भारतीय पारंपरिक कला’ या कलादालनामध्ये विद्यार्थ्यांनी साकारलेल्या विविध चित्रकला व कलाकृतींनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. कलादालनाचे उद्घाटन प्रसिद्ध चित्रकार अमोल सूर्यवंशी यांच्या हस्ते झाले. यावेळी शाळेचे कला शिक्षक चैतन्य शिंदे, आकाश कोरे तसेच इतर शिक्षक, विद्यार्थी व पालकांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक केले.

शाळेच्या क्रीडांगणावर स्मार्ट मार्ट अंतर्गत विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या विविध खाद्यपदार्थांचे विक्री स्टॉल उभारण्यात आले होते. तसेच फन फेअरच्या माध्यमातून विविध खेळ व मनोरंजनाचे उपक्रम राबविण्यात आले. या स्मार्ट मार्ट व फन फेअरचे उद्घाटन संस्थेच्या सदस्या सौ. अमिता अनगळ व सौ. अपर्णा कौलगुड यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास संस्थेच्या खजिनदार सौ. वीनाताई फडके, उपाध्यक्षा सौ. हेमा शिंदे, सौ. नेहाताई फडके, सौ. पल्लवीताई मराठे, सौ. शोभाताई गुळवणी, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. ममता भोकरे, माध्यमिक विभाग समन्वयक विश्वासराव पाटील, प्राथमिक विभाग प्रमुख सौ. सोनल सन्मुख, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण उपक्रमाचे नियोजन विश्वास पाटील, अभिजीत शिंदे व निलोफर मुतवल्ली यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *