चिक्कोडीत 27-28 रोजी सतीश शुगर अवॉर्ड्सचे आयोजन
लक्ष्मणराव चिंगळे यांची माहीती
चिक्कोडी,ता.22(प्रतिनिधी)-
ग्रामीण परिसरातील मुलांना आपल्या अंगातील विविध कला प्रदर्शित करण्याचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने चिक्कोडी शहरात 27 आणि 28 डिसेंबर रोजी दुसऱ्या सतीश शुगर अवॉर्ड्सचे आयोजन करण्यात असल्याची माहिती बुडा अध्यक्ष व चिक्कोडी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे यांनी दिली.ते येथील खासदार कार्यालयात आयोजित बैठकीत बोलत होते.
चिंगळे पुढे म्हणाले, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व पालकमंत्री सतीश जारकीहोळी व खासदार प्रियंका जारकीहोळी व युवा काँग्रेसचे राज्य प्रधान सचिव राहुल जारकीहोळी यांच्या मार्गदर्शनाखाली चिक्कोडीतील कीवड मैदानावर दि.27, 28 रोजी सतीश शुगर्स अवॉर्डसचे आयोजन करण्यात आले आहे.27 रोजी सायंकाळी 6 वाजता पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. चिक्कोडी शैक्षणिक जिल्ह्यातील चिक्कोडी, निपाणी, रायबाग,कागवाड, अथणी तालुक्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या साठी ही स्पर्धा आयोजन केले आहे.यामध्ये गायन, लोकगीत, समूह नृत्य भाषण यासह, विविध स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धेत गायन स्पर्धेसाठी प्राथमिक विभागात विजयी विद्यार्थ्यांना अनुक्रमे 10,000, 7000, 5000 रुपये बक्षीस दिले जाणार आहे. तसेच माध्यमिक विभागात अनुक्रमे 15000, 10,000, 70000 तर महाविद्यालय विभागात अनुक्रमे 15000, 10000 व 7000 रुपये असे बक्षीस विजेत्यांना दिली जाणार आहे.
तसेच लोकगीतसाठी माध्यमिक व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी अनुक्रमे 15000, 10,000, 7000 बक्षीस दिले जाणार आहे.समूह नृत्य स्पर्धेत विभागात प्राथमिक माध्यमिक व महाविद्यालय विद्यार्थ्यांना अनुक्रमे 50,000 40,000, 30000 रुपये बक्षीस दिले जाणार आहे. लोककला नृत्य स्पर्धेत प्राथमिक व माध्यमिक विद्यार्थ्यांना अनुक्रमे 50,000 40,000, 30,000 रुपये बक्षीस दिले जाईल.भाषण स्पर्धेत प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांना 10000, 70000, 5000, व माध्यमिक व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना अनुक्रमे 15,000, 10,000 7000 रुपये बक्षीस दिले जाईल असे सांगितले.अंतिम स्पर्धा असून यापूर्वी कागवाड, निपाणी, चिकोडी, रायबाग, अथणी या ठिकाणी प्राथमिक टप्प्यातील निवड व हारुगिरी येथे सेमी फायनल स्पर्धा झालेल्या आहेत. चिक्कोडी येथे अंतिम स्पर्धा होऊन बक्षीसचे वितरण केले जाईल.
सदर स्पर्धा सतीश जारकीहोळी फाउंडेशनकडून आयोजन केल्या असून ग्रामीण भागातील संधी पासून वंचित असलेल्या मुलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी, त्यांच्यातील सुप्त कलाना व्यासपीठ निर्माण करून देण्याच्या उद्देशाने अशा प्रकारच्या स्पर्धेच्या आयोजन केले जात आहे. यामुळे अनेक मुलांना सोयीचे होऊन जिल्हा राज्य व देश पातळीवर आपले खेळ व कला प्रदर्शन केले आहेत. अशा स्पर्धांमध्ये सर्व जाती धर्माची भाषेचे लोक सहभागी होऊन त्यांची प्रतिभा प्रदर्शित करू शकतात. फाउंडेशनच्या वतीने राज्यातील आठ ठिकाणी मुलांना मोफत आर्मी ट्रेनिंग दिले जाते.या ठिकाणी ट्रेनिंग घेतलेले अनेक मुले आज भारतीय सैन्य दलात सेवा बजावत आहेत. अलीकडेच खासदार प्रियंका जारकीहोळी यांनी मतदारसंघातील विद्यार्थ्यांना विमानाने दिल्लीला घेऊन जाऊन लोकसभेतील अधिवेशन दाखवण्याची व्यवस्था केली. युवा खासदार असलेल्या प्रियंका जारकीहोळी यांनी चांगले काम केले आहे.
यावेळी कर्नाटक प्रदेश काँग्रेस समितीचे प्रधान सचिव महावीर मोहिते, गजानन मंगसुळी, एस.वाय.हंजी रुद्रपा सांगापगोळ, माजी नगराध्यक्ष रामा माने, रियाज मुजावर, काँग्रेसचे जिल्हा प्रधान कार्यदर्शी ॲड एच.एस.नसलापुरे, उद्योजक सुरेश घरबुडे, रियाज चौगला, उमेश पाटील, राजकुमार कोटगी, प्रभाकर कोरे, रामकृष्ण पानबुडे यांच्यासह, विविध कार्यकर्ते उपस्थित होते.


