तमाशा व चित्रपटामुळेच लावणी अधिक लोकप्रिय व लोकाभिमुख झाली-:प्रोफेसर डाॅ.विश्वनाथ शिंदे
कवठेमहांकाळ प्रतिनिधी
लावणी जरी अध्यात्मातून निर्माण झाली असली तरीही लावणी तमाशा व चित्रपटामुळेच समाजात अधिक लोकप्रिय व लोकाभिमुख झाल्याचे प्रतिपादन लोकसाहित्याचे जेष्ठ अभ्यासक प्रोफेसर डाॅ.विश्वनाथ शिंदे यांनी पुणे येथील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील मराठी विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या प्रा डाॅ.आबासाहेब शामराव शिंदे यांच्या ‘सांगली जिल्ह्यातील लावणी वाड्मय’ या संदर्भग्रंथाच्या प्रकाशन समारंभा प्रसंगी बोलत होते.यावेळेस संदर्भग्रंथांच्या प्रकाशन समारंभाचे अध्यक्षस्थानी पुणे विद्यापीठातील मराठी विभागप्रमुख डाॅ.तुकाराम रोंगटे उपस्थित होते.यावेळेस कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत प्रा डाॅ.आबासाहेब शिंदे यांनी केले.प्रास्ताविक किशोर दीपंकर यांनी केले तर आभार मोहन खोत यांनी मानले
यावेळेस प्रोफेसर डाॅ.विश्वनाथ शिंदे बोलतांना म्हणाले की प्रा डाॅ.आबासाहेब शिंदे यांच्या ‘सांगली जिल्ह्यातील लावणी वाड्मय’ या संदर्भग्रंथातून सांगली जिल्ह्यातील शाहीरांच्या अप्रकाशित लावणी रचनांचा संशोधनात्मक द्रष्टीकोणातून वाङ्मयीन मूल्य संशोधनातून प्रकाशात अनल्याने हा संदर्भग्रंथ पुढील अभ्यासकांना अधिक मार्गदर्शन ठरेल यात शंकाच नाही.
‘सांगली जिल्ह्यातील लावणी वाड्मय’ ह्या संदर्भग्रंथांच्या प्रकाशन समारंभा प्रसंगी पुणे विद्यापीठातील मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष प्रा डाॅ.संदीप सांगळे बोलतांना म्हणाले की लावणीच्या संशोधनातून लावणीचे विविध स्वरूपातील वर्गीकरणा मुळे लावणीचे अनेक रुप वाचकांच्या लक्षात आली असून लावणीचा वाङ्मयीन मूल्य स्वरूपात अभ्यासामुळेच लावणीचा हा संदर्भग्रंथ मराठी लोकसाहित्यात अधिक महत्वपूर्ण ठरणार असल्याचे स्पष्ट केले.
पुस्तक प्रकाशन समारंभा प्रसंगी लोककलेचे अभ्यासक बाबाजी कोरडे बोलतांना म्हणाले की सांगली जिल्ह्यातील लावणी विषय अध्यापी कुणीही संशोधनात्मक अभ्यास करून लावणीचे विविध पैलू वाचकांपर्यंत पोचवले नाहीत परंतु प्रा डाॅ.आबासाहेब शिंदे यांनी सांगली जिल्ह्यात गावागावात फिरून शाहीरांच्या अप्रकाशित लावणी रचना संकलित करून त्या अभ्यासपूर्ण लक्षात घेऊन संशोधन स्वरूपात शब्दबद्ध केल्याने ह्या संदर्भग्रंथास अधिक महत्त्व प्राप्त होणार असल्याचे स्पष्ट केले.अध्यक्षीय भाषणात बोलतांना प्रा.डाॅ.तुकाराम रोंगटे म्हणाले की महाराष्ट्रात अप्रकाशित लावणीचा संशोधनात्मक अभ्यास अद्यापी कोणी केल्याचा आमच्या अभ्यासात आढळून आलेला नाही.परंतु प्रा.डाॅ.आबासाहेब शिंदे यांच्या अप्रकाशित लावणी वाड्मय हा संदर्भग्रंथ अधिक लोकप्रिय व लोकाभिमुख होणार यात शंकाच नाही.


