न्यू कॉलेज विद्यार्थींनी मधुरा बाटे आर्मी वुमन्स वेल्फेअर असोसिएशनच्या यंग ऍचीवर ऍप्रिसिएशन अवॉर्ड ने सन्मानित

0
मधुरा गणेश बाटे न्यू कॉलेज

 चीफ ऑफ आर्मी स्टाफ जनरल उपेंद्र द्विवेदी यांच्या हस्ते ऑपरेशन सिंदूर बॅच प्रदान

कोल्हापूर. (प्रतिनिधी) कोल्हापूर विभागातील ११ छात्र सैनिकांची २७ डिसेंबर २०२५ ते ३० जानेवारी २०२६ या कालावधीत दिल्ली येथे एनसीसी राष्ट्रीय प्रजासत्ताक दिन संचलनासाठी आयोजित राष्ट्रीय शिबिरासाठी निवड झाली होती त्यामध्ये मधुरा बाटे हिला उल्लेखनिय कामगिरीबद्दल  गौरवण्यात आले.

     दिल्ली येथे एनसीसी राष्ट्रीय प्रजासत्ताक दिन संचलन शिबिरामध्ये कोल्हापूर विभागाच्या छात्रसैनिकांची उल्लेखनीय कामगिरी केली त्यामध्ये न्यू काँलेज येथील एनसीसी कॅडेट  ज्युनियर अंडर ऑफिसर मधुरा गणेश बाटे हिने ५ महाराष्ट्र बटालियन एनसीसी च्या माध्यमातून विविध क्षेत्रात राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळवलेल्या नैपुण्याबद्दल श्रीमती सुनिता द्विवेदी प्रेसिडेंट- आर्मी वुमन्स वेल्फेअर असोसिएशन (AWWA) यांच्या हस्ते ‘यंग अचीवर ऍप्रिसिएशन अवॉर्ड ‘ देऊन तसेच चीफ ऑफ आर्मी स्टाफ जनरल उपेंद्र द्विवेदी यांच्या हस्ते ऑपरेशन सिंदूर चा बॅच देऊन दिल्ली येथे तिला सन्मानित करण्यात आले आहे.

      मधुरा बाटे हीने क्रीडा विभागाच्या माध्यमातून रोप मल्लखांब, योगा, रिदमिक योगा, हँडबॉल व सॉफ्ट बॉल या खेळामध्ये शालेय, शासकीय, विभागीय स्तर स्पर्धेमध्ये नैपुण्य प्राप्त केले आहे. एनसीसी विभागाच्या माध्यमातून देखील ऑल इंडिया एनसीसी गर्ल्स ट्रेकिंग एक्सपिडिशन उटी या राष्ट्रीय शिबिरासाठी निवड तसेच राज्यस्तरीय कॅडेट वेल्फेअर सोसायटी बेस्ट कॅडेटचा बहुमान तिने मिळवला आहे. व कवायत संचलनामध्ये विशेष प्राविण्य प्राप्त केले आहे.

   सांस्कृतिक विभाग माध्यमातून गांधर्व महाविद्यालयाची भरतनाट्यम नृत्य विशारद पदवी प्राप्त केली आहे. शास्त्रीय नृत्य राष्ट्रीय स्पर्धेत पाच वेळेस सुवर्णपदक मिळवले. तर सिंगापूर येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय शास्त्रीय नृत्य स्पर्धेत ब्रांझ मिडल प्राप्त केले आहे. शिवाजी विद्यापीठ मध्यवर्ती युवक महोत्सवांमध्ये भरतनाट्यम् शास्त्रीय नृत्य प्रकारात प्रथम क्रमांक प्राप्त केला. तसेच साउथ झोन युनिव्हर्सिटी युथ फेस्टिव्हल-२०२६ करिता  निवड झाली आहे. मधुरा बाटे हिच्या सातत्यपूर्ण उल्लेखनीय कामगिरीबद्दल सर्व स्तरातून तिचे कौतुक करण्यात येत आहे.  

        तिला प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस संस्थेचे चेअरमन के. जी. पाटील, दि न्यू कॉलेज कोल्हापूरचे प्राचार्य- डॉक्टर व्ही. एम. पाटील, एनसीसी ग्रुप कमांडर- ब्रिगेडियर राजेश पैठणकर, ५ महाराष्ट्र बटालियन एनसीसी चे कमांडिंग ऑफिसर- कर्नल मानस दीक्षित, ॲडम ऑफिसर- लेफ्टनंट कर्नल अंशुमन पाटील, एनसीसी विभाग प्रमुख सीटीओ सुशील चव्हाण, नृत्य गुरु- संयोगिता पाटील, वडील- गणेश बाटे, आई- धनश्री बाटे यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *