एरंडोली गटातील मतदार आ. सुरेशभाऊ खाडेंसोबत
जनतेची विकासाला साथ, भाजपच्या उमेदवारांना प्रतिसाद
मिरज (प्रतिनिधी)
जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आ. डॉ. सुरेशभाऊ खाडे यांनी एरंडोली जिल्हा परिषद गटासह संपूर्ण मिरज पूर्व भागात गावांना जोडणारे रस्ते, शाळा इमारती, आरोग्य केंद्र, समाज मंदिरे, म्हैसाळ योजनेची प्रलंबित कामे पूर्ण करून सर्वांगीण विकास साधला आहे. एरंडोली जिल्हा परिषद गटात जयश्रीताई पाटील, सलगरे पंचायत समिती गणामध्ये ललिता कोरे, एरंडोली पंचायत समिती गणामध्ये मनीषा पाटील या भाजपच्या कमळ या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत. एरंडोली गटातील मतदार आ. सुरेश खाडे यांच्यासोबत आहेत.
आ. खाडे यांच्या विकासकामांना साथ देत येथील मतदार भाजपच्या तीनही उमेदवारांना विजयी करतील, असा विश्वास तानाजीराव पाटील, पांडुरंग कोरे, रामगोंडा पाटील यांच्याकडून व्यक्त करण्यात आला. सलगरेचे माजी सरपंच तानाजीराव पाटील, बेळंकीचे माजी सरपंच पांडुरंग कोरे, एरंडोलीचे नेते रामगोंडा पाटील यांच्यासह पदाधिकारी भाजपच्या पॅनेलचे नेतृत्व करत आहेत. तानाजीराव पाटील यांच्यासह पॅनेलच्या सर्वच प्रमुखांचा या जिल्हा परिषद, पंचायत समिती गटांमध्ये व्यापक जनसंपर्क आहे. ग्रामस्थांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी ते अहोरात्र धडपडत असतात. त्यांना आ. सुरेश खाडे यांचे पाठबळ मिळते. आ. डॉ. सुरेशभाऊ खाडे, तानाजीराव पाटील, पांडुरंग कोरे, रामगोंडा पाटील यांच्या साथीने एरंडोली गटाच्या विकासासाठी जनता भाजप उमेदवारांच्या पाठीशी उभी आहे, असा विश्वास उमेदवारांनी व्यक्त केला.
विरोधकांचे पोकळ राजकारण...
एरंडोली जिल्हा परिषद गटात विरोधकांनी एकत्र येत भाजप विरुद्ध पोकळ राजकारण सुरू केले आहे. आ. सुरेशभाऊ खाडे यांच्यासह भाजप पॅनेलचे नेते विकासावर, जनतेच्या समस्या सोडवण्यावर, सर्वसामान्य जनतेला मदत करण्यावर विश्वास ठेवून विकासाचे राजकारण करत आहेत. आ. खाडे यांनी या भागात विकास केला आहे. यापुढेही तेच या भागाचा विकास करू शकतात, असा विश्वास भाजप पॅनेलच्या प्रमुखांनी व्यक्त केला.


