चार उपसा सिंचन योजनांना दोन कोटींचा निधी मंजूर ः हुक्केरी-पितापुत्रांची माहीती

0
IMG-20260207-WA0117

चिक्कोडी,ता.07(प्रतिनिधी)-
चिक्कोडी तालुका कार्यक्षेत्रातील इंगळी येथे दोन तसेच एकसंबा व येडूरवाडी येथे प्रत्येकी एक अशा एकूण शेतकऱ्यांच्या चार उपसा सिंचन पाणी योजनांना 2 कोटींचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती विधान परिषद सदस्य व राज्य सरकार दिल्लीचे विशेष प्रतिनिधी प्रकाश हुक्केरी यांनी दिली.ते एकसंबा येथे सदर उपसा सिंचन पाणी योजनेच्या मंजुरी पत्राचे वितरण करून ते बोलत होते.
हुक्केरी पुढे म्हणाले, चिक्कोडी तालुक्यातील इंगळी, एकसंबा, येडूरवाडी येथील शेतकऱ्यांंच्या जिरायती जमिनींना उपसा सिंचन योजनेद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी वारंवार मागणी करण्यात येत होती. त्यानुसार इंगळी येथील मोहन नामदेव पाटोळे व इतर शेतकऱ्यांच्या 51.19 एकर जमिनीला कृष्णा नदीहून पाणी योजना राबविण्यासाठी 83 लाख रुपये, विनायक बसाप्पा चौगुले व इतर शेतकऱ्यांच्या 45.25 एकर शेतीला कृष्णा नदीहून पाणी योजना राबविण्यासाठी 55 लाख रुपये, एकसंबा येथील तानाजी दत्तू पवार व इतर शेतकऱ्यांच्या 24.37 एकर जमिनीला दूधगंगा नदीहून उपसा सिंचन पाणी योजना राबविण्यासाठी 42 लाख रुपये,येडूरवाडी येथील सदाशिव दुंडाप्पा सावळे व इतर शेतकऱ्यांच्या 37 एकर जमिनीला पाणीपुरवठ्यासाठी सिंचन योजना राबविण्यासाठी 20 लाख रुपये असा निधी मंजूर झाला असल्याचे हुक्केरी यांनी सांगितले.
यावेळी लाभार्थी शेतकऱ्यांना मंजुरी पत्राचे वितरण केले.पाणी योजनेचे काम दर्जेदार करून घ्यावे तसेच योजना कार्यरत झाल्यानंतर जमिनीतून वैविध्यपूर्ण पिके घेऊन आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी व्हावे. या चार पाणी योजनांच्या माध्यमातून 159.01 एकर जमिनीला पाण्याची उपलब्धता होणार असून यामध्ये जलवाहिन्या घालने, वीज जोडणी तसेच पंपसेट बसवणे ही सर्व कामे करण्यात येणार असल्याचे सांगितले. यावेळी आमदार गणेश हुक्केरी यांच्यासह, इंगळी, एकसंबा, येडूरवाडी शेतकरी बांधव व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *