शिराळ्यात भाजपाला धोबी पछाड; दोन्ही राष्ट्रवादी सरस
विराज व राजेश्वरी नाईकांचा मोठ्या फरकाने विजय, कोकरूडमध्ये जनसुराज्यचा अपवाद
शिराळा (प्रतिनिधी) : विधानसभा निवडणुकीत भाजपाचे आमदार सत्यजित देशमुख यांनी मिळवलेला विजयाचा आत्मविश्वास जिल्हा परिषद–पंचायत समितीच्या निकालात मात्र पुरता ढासळला. शिराळा तालुक्यातील बहुतांश गटांमध्ये दोन्ही राष्ट्रवादींच्या युतीने भाजपाला धोबीपछाड देत आपले वर्चस्व पुन्हा अधोरेखित केले. पणुंब्रे–वारूण, वाकुर्डे बुद्रुक, पाचुंब्री आणि मांगले या गटांत राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी निर्णायक आघाडी घेत पंचायत समितीवरील पकड कायम ठेवली. कोकरूड गटात मात्र भाजप पुरस्कृत जनसुराज्य पक्षाच्या साई तेजस्विनी देशमुख यांनी विजय मिळवत अपवाद ठरवला.
मांगले जिल्हा परिषद मतदारसंघात शरदचंद्र पवार गटाचे विराज मानसिंगराव नाईक यांनी तब्बल ७,९४० मतांचे भक्कम मताधिक्य मिळवत भाजपचे विजय सुभाष पाटील यांचा पराभव केला. वाकुर्डे बुद्रुक गटात राष्ट्रवादीच्या राजेश्वरी रणधीर नाईक यांनी ४,८८५ मतांनी विजय मिळवत भाजपच्या स्मिता भोसले यांना पिछाडीवर टाकले. कोकरूडमध्ये जनसुराज्य पक्षाच्या साई तेजस्विनी देशमुख यांनी ४,०७६ मतांच्या फरकाने राष्ट्रवादीचे विनोद पन्हाळकर यांचा पराभव केला.
पंचायत समितीच्या निवडणुकांतही राष्ट्रवादीची सरशी स्पष्ट दिसून आली. मणदूरमध्ये मनिषा वसंत पाटील, वाकुर्डे बुद्रुकमध्ये रविंद्र आढाव, पाचुंब्रीमध्ये सविता महाडिक, कणदूरमध्ये सम्राट रायसिंग नाईक, सागावमध्ये सायली अमित पाटील आणि मांगलेमध्ये राष्ट्रवादी पुरस्कृत अपक्ष मोहन तानाजी पाटील यांनी विजय मिळवला. कोकरूड पंचायत समिती मतदारसंघात मात्र भाजपचे बाजीराव शंकर पाटील विजयी झाले.
एकूणच निकाल पाहता शिराळा तालुक्यातील राजकीय चित्रात भाजपला मोठा धक्का बसला असून दोन्ही राष्ट्रवादींची आघाडी पुन्हा एकदा प्रभावी ठरल्याचे स्पष्ट झाले आहे. मोठ्या मताधिक्याने विजयी झालेले विराज मानसिंगराव नाईक, राजेश्वरी रणधीर नाईक आणि साई तेजस्विनी देशमुख हे या निवडणुकीचे केंद्रबिंदू ठरले.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक निकाल
जिल्हा परिषद
१) पणुंब्रे–वारूण मतदारसंघ
शीला शंकर मोहिते (राष्ट्रवादी काँग्रेस – शरद पवार गट) विजयी
मिळालेली मते : ११,७०८
मताधिक्य : १,१७०
रेश्मा हणमंत पाटील (भाजप)
मिळालेली मते : १०,५३८
२) वाकुर्डे बुद्रुक मतदारसंघ
राजेश्वरी रणधीर नाईक (राष्ट्रवादी) विजयी
मिळालेली मते : १४,९४४
मताधिक्य : ४,८८५
स्मिता बाबुराव भोसले (भाजप)
मिळालेली मते : १०,०६९
३) कोकरूड मतदारसंघ
साई तेजस्विनी देशमुख (जनसुराज्य पक्ष) विजयी
मिळालेली मते : १३,३४६
मताधिक्य : ४,०७६
विनोद सर्जेराव पन्हाळकर (राष्ट्रवादी) – ९,२७०
बाबासो गणपती कदम (ओबीसी बहुजन आघाडी) – ३४८
४) मांगले मतदारसंघ
विराज मानसिंगराव नाईक (शरदचंद्र पवार गट) विजयी
मिळालेली मते : १७,७४१
मताधिक्य : ७,९४०
विजय सुभाष पाटील (भाजप)
मिळालेली मते : ९,८०१
पंचायत समिती
मणदूर मतदारसंघ
मनिषा वसंत पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस) विजयी
मिळालेली मते : ५,५३८
मताधिक्य : ६२२
सुशिला हिंदूराव नांगरे (भाजप) – ४,९१६
पणुंब्रे–वारूण मतदारसंघ
सुनिता मनोहर चिंचोलकर (भाजप) विजयी
मिळालेली मते : ५,९०४
मताधिक्य : १,०२९
मंगल राजाराम पाटील (राष्ट्रवादी – शरद पवार) – ४,८७५
लक्ष्मी अमर सावंत (मनसे) – ९८८
वाकुर्डे बुद्रुक मतदारसंघ
रविंद्र कृष्णा आढाव (राष्ट्रवादी) विजयी
मिळालेली मते : ६,५१५
मताधिक्य : ९२४
नितीन तुकाराम जाधव (भाजप) – ५,५९१
स्वप्नील मधुकर कांबळे (वंचित बहुजन आघाडी) – २५९
पाचुंब्री मतदारसंघ
सविता महाडिक (राष्ट्रवादी) विजयी
मिळालेली मते : ७,०६१
मताधिक्य : १,५६५
वैशाली अनंत सपकाळ (अपक्ष) – ५,४९६
कोकरूड मतदारसंघ
बाजीराव शंकर पाटील (भाजप) विजयी
मिळालेली मते : ५,७३१
मताधिक्य : १,२५१
प्रमोद विश्वास पाटील (राष्ट्रवादी) – ४,४९०
प्रकाश नथुराम सुतार (ओबीसी बहुजन आघाडी) – ३०१
देवेंद्र वसंत धस (अपक्ष) – २७४
कणदूर मतदारसंघ
सम्राट रायसिंग नाईक (राष्ट्रवादी) विजयी
मिळालेली मते : ७,०४७
मताधिक्य : १,४३८
आनंदा पांडुरंग पाटील (भाजप) – ५,१०९
सागाव मतदारसंघ
सायली अमित पाटील (शरद पवार गट) विजयी
मिळालेली मते : ८,८८६
मताधिक्य : ४,०८४
विद्या अरुण पाटील (भाजप) – ४,८०२
मांगले मतदारसंघ
मोहन तानाजी पाटील (राष्ट्रवादी पुरस्कृत अपक्ष) विजयी
मिळालेली मते : ७,४१३
मताधिक्य : १,५५२
धनाजी निवृत्ती नरुटे (भाजप) – ५,८६१
सतीश निळकंठ पाटील (अपक्ष) – ४५८
सर्वाधिक मताधिक्य
साई तेजस्विनी देशमुख – ४,०७४ मतांनी विजयी
विराज मानसिंगराव नाईक – ७,९४० मतांनी विजयी
राजेश्वरी रणधीर नाईक – ४,८८५ मतांनी विजयी
४०७४मताधिक्याने विजयी



