कमला कॉलेजमध्ये योगशास्त्र विभागातर्फे आजी–माजी विद्यार्थीनी मेळावा उत्साहात संपन्न
यावेळी पी.जी. डिप्लोमा इन योग थेरपी व एम.ए. योगशास्त्र च्या आजी–माजी विद्यार्थीनी उपस्थित होत्या.
कोल्हापूर (प्रतिनिधी) कमला कॉलेज, कोल्हापूर येथे ९ फेब्रुवारी २०२६ रोजी योगशास्त्र विभागामार्फत आजी–माजी विद्यार्थीनी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ताराराणी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. क्रांतिकुमार पाटील उपस्थित होते. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.तेजस्विनी मुडेकर व योगशास्त्र विभाग प्रमुख सुनिता काळे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
या मेळाव्यात आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय पातळीवरील योग स्पर्धेमध्ये सहभागी योगसाधक, पी.जी.डिप्लोमा इन योग थेरपी (PGDYT) तसेच एम.ए. योगशास्त्र अभ्यासक्रमातील प्रथम क्रमांक व विविध क्षेत्रात प्लेसमेंट मिळवलेल्या विद्यार्थिनींचा सत्कार पुष्पगुच्छ देऊन डॉ. क्रांतिकुमार पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमादरम्यान गुणवंत विद्यार्थिनींच्या पीपीटी सादरीकरणाचे आयोजन करण्यात आले. तसेच गुणवंत विद्यार्थिनींच्या यादीचे वाचन सौ.श्रिया आवटे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सायली पारेख यांनी केले, तर कार्यक्रमाचे आभार जिमखाना विभाग प्रमुख लेफ्टनंट ज्योती लेंगरे यांनी मानले. या मेळाव्यास पी.जी. डिप्लोमा इन योग थेरपी व एम.ए. योगशास्त्र अभ्यासक्रमातील आजी–माजी विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

ताराराणी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. क्रांतिकुमार पाटील


