शहरस्तरीय कवायत स्पर्धेत लक्ष्मीबाई कृ. जरग विद्यालयाचा डबल धमाका

0
1000268626

पटकाविले तब्बल ११ हजार रुपयांचे पारितोषिक

कोल्हापूर (प्रतिनिधी) कोल्हापूर महानगरपालिका आयोजित आंतरशालेय शहरस्तरीय कवायत स्पर्धेत लक्ष्मीबाई कृष्णाजी जरग विद्यालयाने शिस्तबद्ध कवायत, उत्कृष्ट समन्वय आणि वाद्यवृंदाच्या तालबद्ध साथीतून प्रभावी संचलन सादर करत प्रेक्षकांची मने जिंकली. मुलांच्या व मुलींच्या अशा दोन्ही विभागांत अव्वल क्रमांक पटकावत विद्यालयाने डबल धमाका साध्य केला.

    दोन्ही संघांनी मिळून तब्बल ११,००० रुपयांचे पारितोषिक व सन्मानचिन्ह प्राप्त केले. या यशामागे मुख्याध्यापिका सौ. नीता ठोंबरे व उपमुख्याध्यापक श्री. शिवाजी पाटील यांचे प्रेरणादायी नेतृत्व लाभले.

 सुजाता पोळ, युवराज सरनाईक, जोतिबा जाधव, पुष्पा गायकवाड, बळवंत पिंपळकर, उमेश गाताडे, संतोष मोरमारे, विजय सुतार, संजयकुमार देसाई, अजित कानकेकर, दिग्विजय नाईक, सुनील रावते, वैशाली शेलार, दिपाली चव्हाण, हरि खोत, योगेश व्हटकर तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्य यांचे मार्गदर्शन लाभले. या उल्लेखनीय यशाबद्दल विद्यालयातील सर्व विद्यार्थी, शिक्षक व पालक यांचे मनःपूर्वक अभिनंदन! 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *