बोरगाव शादीमहालसाठी 1 कोटी तर दोड्डबस्ती कामासाठी 50 लाखाचा निधी-जंगटे
बोरगाव,ता.05(प्रतिनिधी)-
पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या सहकार्याने आमदार शशिकला जोल्ले यांच्या विशेष प्रयत्नातून बोरगाव येथील मुस्लिम समाजाच्या शादीमहल बांधकामासाठी 01 कोटी तर शहरातील जैन समाजाच्या दोडबस्ती कामासाठी 50 लाखाचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती श्री हालसिद्धनाथ साखर कारखान्याचे संचालक व बोरगावचे नगरसेवक शरद जंगटे यांनी दिली.
बोलताना ते म्हणाले,बोरगाव हे सर्वाधिक जैन वस्तीचे शहर आहे.असे असतानाही शहरा मधील या दोड्ड बस्ती मंदिर जीर्णोधाराकडे अनेकांनी दुर्लक्ष केले होते. त्यामुळे याची दखल घेऊन माजी मंत्री आमदार शशिकला जोल्ले यांनी यासाठी मायनॉरिटी फंडातून 02 कोटीचा निधी मंजूर व्हावा यासाठी प्रस्ताव पाठवला असता, पहिल्याच टप्प्यात या कामासाठी 50 लाखाचा निधी मंजूर झाला आहे.तर उर्वरित रक्कम ही बांधकामाच्या टप्प्याटप्प्याने संबंधित मंदिर कमिटीच्या नावे येणार आहे.शिवाय मुस्लिम समाजातील शादीमहल बांधकासाठी 02 कोटीचा प्रस्ताव पाठवला असता,यासाठीही पहिल्या टप्प्यात 01 कोटीचा निधी मंजूर होऊन याचाही उर्वरित निधी कामाचा टप्पा पूर्ण होताच मिळणार आहे. आम्ही केलेले कामाचे श्रेय फक्त आम्हीच घेत असतो दुसऱ्यांच्या कामाचे श्रेय आम्ही कधीच घेतलं नाही.
सदर निधी मंजुरीसाठी पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांचे विशेष प्रयत्न लाभले आहे .त्यांच्या माध्यमातूनच विकास होत आहे. त्याचबरोबर आमदार शशिकला जाल्ले यांनीही वेळोवेळी या निधीसाठी मागणी केल्याने हा निधी मंजूर झाला आहे. हा निधी मंजूर साठी सर्वच कागदपत्राची पूर्तता आपण केले आहे. मी अनेक वेळा मंत्री जारकीहोळी यांची भेट घेऊन आमदार शशिकला जोल्ले यांच्याकडे मागणी केली होती. याचे पुरावे ही माझ्याकडे आहेत. निधी मंजुरीसाठी कोण प्रयत्न केले आहेत हे खुद्द विरोधकांनी दाखवून द्यावे.यामध्ये श्रीवादाचा प्रश्नच येत नाही. विकासात आपण कधीच राजकारण केले नसल्याचे यावेळी शरद जंगटे यांनी सांगितले.


