लोकनेते प्रा.शरद पाटील महाविद्यालयाच्या तन्वी शिरोळे हिला गुणवत्ता शिष्यवृत्ती
मिरज (प्रतिनिधी)
प्राचार्य बॅरिस्टर पी. जी. पाटील व सुमतीबाई पाटील प्रतिष्ठान सातारा यांच्या वतीने शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर परिक्षेत्रातील गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देऊन प्रोत्साहित केले जाते. याचाच एक भाग म्हणून मिरज येथील लोकनेते प्रा. शरद पाटील महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु. तन्वी श्रीकांत शिरोळे हिला 2025-26 या शैक्षणिक वर्षाची बॅरिस्टर पी.जी.पाटील गुणवत्ता शिष्यवृत्ती प्राप्त झाली आहे.
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर तीन जिल्ह्याच्या परिक्षेत्रातील सर्वात जास्त गुणांचा विचार करून सदरची शिष्यवृत्ती संबंधित विद्यार्थ्यांना दिली जाते. सदरची शिष्यवृत्ती लोकनेते प्रा. शरद पाटील महाविद्यालयामधील बी. ए. भाग 3 मध्ये इंग्रजी (स्पेशल) या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनीने प्राप्त करून महाविद्यालयाच्या गौरवामध्ये मानाचा तुरा रोवला आहे व या महाविद्यालयाची पुरस्कार प्राप्त करण्याची परंपरा अखंडित ठेवली आहे. तिच्या या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. एस. बी. गायकवाड, इंग्रजी विभागप्रमुख डॉ. प्रकाश पाटील आणि यशवंत शिक्षण संस्थेचे चेअरमन राजगोंडा (तात्या) पाटील यांनी विद्यार्थिनीचे अभिनंदन केले आहे.


