रयत शिक्षण संस्थेच्या दक्षिण विभागातील ४४ विद्यार्थ्यांची ‘इन्स्पायर अवॉर्ड’ शिष्यवृत्तीसाठी निवड
नाविन्यपूर्ण विज्ञान प्रकल्पांची दखल; सांगलीसह पाच जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांचा समावेश
मिरज (प्रतिनिधी)
विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित व्हावा आणि संशोधनाची आवड निर्माण व्हावी या उद्देशाने केंद्र शासनाच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागामार्फत दिल्या जाणाऱ्या ‘इन्स्पायर अवॉर्ड’ शिष्यवृत्तीसाठी रयत शिक्षण संस्थेच्या दक्षिण विभागातील ४४ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. या यशामुळे विभागातील शाळांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
दक्षिण विभागातील ८४ शाखांपैकी ३१ शाखांमधील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नाविन्यपूर्ण विज्ञान प्रकल्पांच्या आधारे ही निवड करण्यात आली. या यशामागे संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी, विभागीय चेअरमन एम. बी. शेख, विभागीय अधिकारी अशोक शिंदे, सहाय्यक विभागीय अधिकारी अँथोनी डिसोझा व उत्तम वाळवेकर यांचे मार्गदर्शन लाभले.
विद्यार्थी नोंदणी व मार्गदर्शनासाठी रयत विज्ञान परिषदेचे विभागीय समन्वयक व इन्स्पायर प्रमुख हणमंत म्हेत्रे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. शाखाप्रमुख व विज्ञान शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांनी नाविन्यपूर्ण विज्ञान प्रकल्प सादर करत हे यश मिळवले. निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये सांगली जिल्ह्यातील २३, कोल्हापूर १६, रत्नागिरी–सिंधुदुर्ग ४ आणि बेळगाव १ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. पुढील टप्प्यात जिल्हा, राज्य व राष्ट्रीय स्तरावरही हे विद्यार्थी उल्लेखनीय कामगिरी करतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
इन्स्पायर अवॉर्ड शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थी :
वैष्णवी मांडके (शिरसगाव), सायली जगदाळे, रुद्रा जाधव (मो. वडगाव), आदिती सूर्यवंशी (खेराडे वांगी), पृथ्वीराज इलागर (बळवंत कॉलेज, विटा), ओंकार शिंदे (गार्डी घानवड), प्रांजल पडळकर (चव्हाण हायस्कूल, विटा), अनंत मुळीक (खानापूर), शुभम जानकर, मुबीन मुजावर (वेजेगाव), वरद पाटील (म्हैसाळ), चिन्मय हताळे (कसबे डिग्रज), स्वस्तिक सुतार, रणवीर दुधाळ (के.बी.पी. इंग्लिश मीडियम, सांगली), पृथ्वीराज घाटगे, दिव्यरत्न माळी (दुधगाव मुले), भावना भोई (रामानंदनगर मुले), प्रकाश लोहार (शिरसी), गणेश माने (सावर्डे), अनुष्का माळी, पार्थ जाधव (विसापूर), प्रणाली चव्हाण (नेर्ले कन्या), पृथ्वीराज माने (आष्टा मुले), मेधा पाटील (कुंभोज इंग्लिश मीडियम), दीपक कोळी, आयुष सुतार, वेदिका वंजारे, पृथ्वीराज कोकणे (रुई), प्रतिक पोवार, जानवी शिंदे (बोरीवडे), रेहान हवालदार (मलकापूर मुले), स्वरा पाटील, आर्या भोसले (मलकापूर मुली), यश डवरी (सरूड), श्रेया जाधव (शिरढोण), रुद्रा सोनकर, आर्या गुरव (शिरगाव), काजळ मोडसिंग (धामणी), तेजस्विनी म्हसकर, देवयानी पंढरे (सोवेली), अद्विक पाटील (पालवणी), श्रेयश शिंदे (कुर्ली).


