खाडे शैक्षणिक संकुल मधील ‘एमटीडीकेज् रोबो फेस्ट 2K26’ उत्साहात

0
WhatsApp Image 2026-03-21 at 7.25.06 AM

मिरज (प्रतिनिधी)

येथील ‘एमटीडीकेज् रोबो फेस्ट 2K26’ हा विज्ञान व तंत्रज्ञानावर आधारित रोबोटिक्स महोत्सव एमटीडीके शैक्षणिक संकुलमध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विविध रोबोटिक्स प्रकल्पांचे आकर्षक सादरीकरण करण्यात आले. कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे विद्यार्थ्यांनी बनवलेली रेसिंग रोबोट कार, वाय-फाय व ब्लूटूथद्वारे नियंत्रित गाड्या तसेच विविध प्रत्यक्ष रोबोटिक्स प्रकल्प होते.

या प्रकल्पांमधून विद्यार्थ्यांची सर्जनशीलता, तांत्रिक कौशल्य आणि नवोपक्रमशील विचारसरणी प्रकर्षाने दिसून आली. उपक्रमाचे उद्घाटन डॉ. सोनाली रोकडे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांनी विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे व मेहनतीचे कौतुक केले. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान व तंत्रज्ञानाविषयी आवड निर्माण होऊन भविष्यातील संशोधक घडण्यास मदत होते, असे मत प्रमुख पाहुण्या डॉ. रोकडे यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाचे नियोजन मुख्य कार्यकारी अधिकारी स्वाती खाडे यांच्या नेतृत्वाखाली मुख्याध्यापिका संगीता पाटील यांनी सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांच्या सहकार्याने उत्कृष्ट पद्धतीने केले. उपक्रमास माजी मंत्री आ. डॉ. सुरेश भाऊ खाडे, संचालिका सुमनताई खाडे, सुशांत खाडे, सुजित खाडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *