बेंगळूर येथे 24 रोजी अल्पसंख्यांक समाजाची निषेध सभा-राजेंद्र वड्डर यांंची माहीती

0

निपाणी,ता.19(प्रतिनिधी)-
अंतर्गत आरक्षण रोस्टर वाटपाला विरोध आणि जुन्या आरक्षण नियमानुसार त्वरित भरतीची मागणी यासाठी भोवी समाज, बंजारा, कोरम, चालवाडी, चर्मकार यांच्यासह अल्पसंख्याक जातीच्या विषयावर चर्चा करण्यासाठी दि.24 मार्च रोजी सकाळी दहा वाजता बेंगळूर येथील फ्रीडम पार्कमध्ये एक भव्य निषेध सभा आयोजित केली आहे. अशी माहीती माजी जिल्हा पंचायत सदस्य राजेंद्र वड्डर यांनी दिली.
या सभेच्या विषयाबद्दल बेळगाव जिल्ह्यातील भोवी वडर समाजाच्या नेत्यांच दि.20 मार्च रोजी सभा सकाळी दहा वाजता बेळगाव येथे आयोजित करण्यात आले आहे.तरी सर्व भोवी वडर समाजाच्या सर्व नेत्यांनी या सभेला उपस्थित रहावे असे अवाहन वड्डर यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *