यश मिळविण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न आवश्यक : डॉ. रामचंद्र पवार

0
WhatsApp Image 2026-03-27 at 2.12.46 PM

रयत शिक्षण संस्थेचे राजर्षी छत्रपती शाहू कॉलेज, कदमवाडी रोड, कोल्हापूर येथे वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ  अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य, प्रो. डॉ. डी. आर. भोसले 

कोल्हापूर, (प्रतिनिधी)  कोणतेही यश मिळविण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न आवश्यक आहेत. आजचा काळ हा  स्वत:च्या शक्यता आजमाविण्याचा काळ आहे. ह्या काळाने उपलब्ध केलेल्या संधींचा लाभ घ्यायचा असेल तर आपण सतत नवनवी कौशल्ये आत्मसाथ करायला हवी. जेणेकरून आपल्यासाठी आपण अधिक संधी उपलब्ध करून देवू शकतो. असे मत शिवाजी विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे संचालक डॉ. रामचंद्र पवार यांनी व्यक्त केले. ते रयत शिक्षण संस्थेचे राजर्षी छत्रपती शाहू कॉलेज, कदमवाडी रोड, कोल्हापूर येथे आयोजित केलेल्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ  सोहळ्यात ते बोलत होते.

    कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य, प्रो. डॉ. डी. आर. भोसले  हे होते.   डॉ. पवार पुढे म्हणाले की, नोकरीसाठी कोणत्याही एका गोष्टीवर अवलंबून राहू नका. आपल्या नोकरीसाठी तीन पर्याय तयार ठेवा. त्यासाठी आपण प्रयत्न करा. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षा मा. सरोज पाटील (माई) यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगताच्या प्रारंभी पुरस्कार प्राप्त सर्व सेवक विद्यार्थी यांचे कौतुक केले. ह्या महाविद्यालयाच्या नावलौकिक अधिक वाढावा यासाठी आपण  सर्वांनी अधिकचे प्रयत्न करावे. असे उपस्थितांना आवाहन केले. यश हे सहज साध्य गोष्ट नाही. जगात प्रचंड स्पर्धा आहे. ही स्पर्धा आपण आपल्या प्रयत्नांच्या जोरावर जिंकू शकतो. असा आशावाद त्यांनी उपस्थित सर्वांना दिला. या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी सदस्या मा. सरोज पाटील (माई) महाविद्यालय विकास समितीच्या चेअरमन तथा जनरल बॉडी सदस्या सौ. संगीता प्रशांत पाटील, जनरल बॉडी सदस्य मा. प्रशांत पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

    वार्षिक पारितोषिक वितरण सोहळ्याचे औचित्य साधून शैक्षणिक वर्ष २०२५ – २६ मध्ये उल्लेखनीय कार्य केलेल्या वरिष्ठ व कनिष्ठ विभागातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचा मान्यवरांच्या हस्ते गुणगौरव करण्यात आला. याबरोबरच  कला, क्रीडा, राष्ट्रीय सेवा योजना व एनसीसीमध्ये उल्लेखनीय कार्य केले विद्यार्थी यांना सन्मानित करण्यात आले. ह्या कार्यक्रमास रयत शिक्षण संस्थेचे आजीव सेवक प्रा. डी. एम गायकवाड,  कला विभागाचे उपप्राचार्य, डॉ. ए. पी. उबाळे,  विज्ञान विभागाच्या उपप्राचार्या, प्रो. डॉ. पी. बी. पिस्टे, वाणिज्य विभागाच्या उपप्राचार्या, प्रो. डॉ. एम. बी. देसाई,  विविध विभागाचे विभागप्रमुख, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

     कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये  डॉ. जी. एम. लवंगारे यांनी महाविद्यालयाच्या आजवरच्या  क्रीडा क्षेत्रातील दैदीप्यमान  प्रगतीचा आढावा घेतला. शारीरिक शिक्षण संचालक डॉ. विक्रम नांगरे  यांनी शैक्षणिक वर्ष २०२५-२६  च्या जिमखाना अहवालाचे वाचन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. शामल हुंबरे यांनी केले. प्रा. सविता माजगावकर यांनी आभार प्रदर्शन केले. याप्रसंगी रयत शिक्षण संस्थेचे लाईफ मेंबर प्रा. डी. एम. गायकवाड, आयक्युएससीचे समन्वयक  डॉ. यु. एस. शेळके, विज्ञान विभागाच्या उपप्राचार्या, प्रो. डॉ. पी. बी. पिस्टे, कला विभागाचे उपप्राचार्य, डॉ. ए. पी. उबाळे, ज्युनिअर विभागाच्या उपप्राचार्या, प्रा. एल. बी. चव्हाण, कार्यालयीन अधीक्षक श्री. बी. एम. शिंदे,  सर्व विभागाचे विभागप्रमुख, विद्यार्थी, प्राध्यापक तसेच शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *