शिवाजी विद्यापीठ आंतर विभागीय सायकलिंग स्पर्धेत रयतच्या शाहू कॉलेजचा भूषण पाटील प्रथम

0
WhatsApp Image 2026-03-27 at 2.17.44 PM

कोल्हापूर, (प्रतिनिधी)  आदर्श कॉलेज, विटा येथे शिवाजी विद्यापीठ आंतर विभागीय सायकलिंग स्पर्धा संपन्न झाल्या. ह्या स्पर्धेत  रयतच्या शाहू कॉलेजचा विद्यार्थी  भूषण पाटील यांने  प्रथम प्राप्त केला. भूषण सध्या रयत शिक्षण संस्थेचे राजर्षी छत्रपती शाहू कॉलेज, कदमवाडी रोड, कोल्हापूर येथे कला शाखेत पदवीचे शिक्षण घेत आहे. त्याला महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक डॉ. विक्रमसिंह नांगरे यांचे  मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्याच्या ह्या यशाबद्दल रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी सदस्या मा. सरोज पाटील (माई) महाविद्यालय विकास समितीच्या चेअरमन तथा जनरल बॉडी सदस्या सौ. संगीता प्रशांत पाटील, जनरल बॉडी सदस्य मा. प्रशांत पाटील, महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य, प्रो. डॉ. डी. आर. भोसले यांनी त्यांचे अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *