विद्यार्थ्यांनी ग्रामीण संधींचा लाभ घ्यावा – अभिनेते सचिन काळे

0
WhatsApp Image 2026-03-28 at 11.10.47 AM (1)

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष व माजी आमदार बाबासाहेब पाटील

सरूड (प्रतिनिधी) विद्यार्थ्यांनी केवळ शिक्षणापुरते मर्यादित न राहता ग्रामीण भागातील विविध संधींचा लाभ घेऊन आपले कर्तृत्व सिद्ध करावे, असे आवाहन “चला हवा येऊ द्या” फेम अभिनेते सचिन काळे यांनी केले. येथील श्री शिव-शाहू महाविद्यालयाच्या ४२ व्या वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एच. टी. दिंडे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले, तर प्रा. प्रकाश नाईक यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली.

सचिन काळे पुढे म्हणाले की, निसर्गाच्या सानिध्यातच खरे सुंदर जीवन जगता येते आणि निसर्गाशिवाय जीवन निरर्थक आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून संस्थेचे अध्यक्ष व माजी आमदार बाबासाहेब पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, आजच्या तरुणांनी आपले ध्येय साध्य करण्यासाठी विज्ञानवादी दृष्टिकोन ठेवून पुढे वाटचाल करावी.

यावेळी स्नेहसंमेलन प्रमुख प्रा. डी. बी. श्रीराम यांनी वार्षिक अहवाल सादर केला. कार्यक्रमात विविध गुणवंत विद्यार्थी व प्राध्यापकांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

या प्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष युवराज पाटील, अनुराधा पाटील, प्रा. डी. आर. नांगरे, डॉ. के. ए. पाटील, प्रा. एल. टी. आरगे, प्रा. सुगत बनसोडे, प्रा. अशोक पाटील, जी. एस. पाटील, ए. जी. कांबळे, एस. टी. लष्कर, प्रा. एस. एम. पाटील, डॉ. धनश्री रोडे-पाटील, सरपंच भगवान नांगरे, लालासो नाईक तसेच प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. रघुनाथ मुडळे व प्रा. सुलोचना मोहिते यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. के. एन. पाटील यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *