मोहन वनखंडे यांच्या पुढाकाराने मिरज तालुक्यासाठीच्या सुसज्ज प्रशासकीय इमारतीच्या प्रस्तावास वेग

0
IMG-20260422-WA0079

मिरज (प्रतिनिधी)
मिरज तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालये एकत्रितपणे कार्यरत राहावीत, तसेच नागरिकांना एकाच ठिकाणी सर्व सुविधा उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने सुसज्ज प्रशासकीय इमारत उभारण्याचा प्रस्ताव प्रगतीपथावर आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना महानगरप्रमुख प्रा. मोहन वनखंडे यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले.

या भेटीदरम्यान मंत्री बावनकुळे यांनी तात्काळ दखल घेत सांगली जिल्हाधिकारी यांना मिरज तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालये एकत्रित करणाऱ्या सुसज्ज इमारतीसाठी प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याचे आदेश दिले. यानंतर प्रा. मोहन वनखंडे यांनी सांगली जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन या विषयावर सविस्तर आणि सकारात्मक चर्चा केली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित प्रस्ताव लवकरात लवकर शासनाकडे पाठविण्याचे आश्वासन दिले.

मिरज तालुक्यात प्रशासकीय कामांसाठी विविध कार्यालयांमध्ये नागरिकांना वारंवार फेऱ्या माराव्या लागतात. प्रस्तावित सुसज्ज प्रशासकीय इमारतीमुळे ही समस्या मोठ्या प्रमाणात सुटण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तसेच प्रशासनातील समन्वय वाढून कामकाज अधिक गतिमान होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *