नूतन पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांचा मदनी चॅरिटेबल ट्रस्टतर्फे सत्कार

0
madni trust (2)

मिरज (प्रतिनिधी)
सांगली जिल्ह्याचे नूतन पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांचे मदनी चॅरिटेबल ट्रस्ट, सांगलीतर्फे स्वागत करण्यात आले. यावेळी संस्थेच्या वतीने त्यांच्या सामाजिक उपक्रमांचा सविस्तर अहवाल दोशी यांच्यासमोर सादर करण्यात आला. पोलीस अधीक्षक दोशी यांनी संस्थेच्या कार्याचे कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

तसेच सांगली जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी प्रभावी आणि पारदर्शक कामकाज करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. त्यांच्या कार्यक्षम नेतृत्वामुळे जिल्ह्यात सकारात्मक बदल घडतील, असा विश्वास संस्थेचे अध्यक्ष हाफिज सद्दाम सय्यद यांनी व्यक्त केला. महासचिव सुफियान पठाण यांच्या हस्ते तुषार दोशी यांचा सत्कार करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *