बी.बी.ए विभागामार्फत ४ दिवस मोफत CET कार्यशाळा यशस्वीरित्या संपन्न

0

बी.बी.ए विभागामार्फत ४ दिवस मोफत CET कार्यशाळा यशस्वीरित्या संपन्न

कोल्हापूर (प्रतिनिधी) कॉमर्स कॉलेजमध्ये बी.बी.ए विभागामार्फत Government of Maharashtra आयोजितMAH-BHMCT / BCA / BBA / BBM / BMS CET परीक्षेसाठी मोफत मार्गदर्शन कार्यशाळा उत्साहात पार पडली. या कार्यशाळेसाठी प्राचार्या डॉ. व्ही. व्ही. मैंदर्गी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यशाळेचे आयोजन डॉ.सीमा बेनाडे यांनी केले. या कार्यशाळेसाठी विविध कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. ही कार्यशाळा विद्यार्थ्यांसाठी निशुल्क मोफत घेण्यात आली. कार्यशाळेमध्ये तज्ज्ञ मार्गदर्शकांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवून या संधीचा लाभ घेतला. भविष्यातील शैक्षणिक वाटचालीसाठी ही कार्यशाळा अत्यंत उपयुक्त ठरली. यासाठी कौन्सिल ऑफ एज्युकेशन अध्यक्षा सौ. रजनीताई मगदूम, उपाध्यक्ष डॉ. प्रसाद मगदूम, सचिव डॉ. व्ही. एन. मगदूम, संचालक ॲड. वैभव पेडणेकर, व ॲड. अमित बाडकर यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी बी.बी.ए , बी.सी.ए विभागातील सर्व प्राध्यापक वर्ग उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *