कोंबिंग ऑपरेशनमध्ये मिरज ग्रामीण पोलिसांना मोठे यश; १० गंभीर गुन्ह्यांतील मुख्य आरोपीसह तिघांना अटक
मिरज (प्रतिनिधी)
लिंगनूर येथे पोलिसांनी राबविलेल्या कोंबिंग ऑपरेशनमध्ये दहा गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभाग असलेल्या मुख्य आरोपीसह तीन जणांना अटक करण्यात मिरज ग्रामीण पोलिसांना यश आले. २०१८ पासून फरार असलेला सिराज उर्फ किरण शिसफुल भोसले (वय ३२, रा. बोलवाड, ता. मिरज, सध्या रा. लिंगनूर) याच्यासह क्रांती जलवा भोसले (वय १९) व विश्वनाथ फुल भोसले (वय २३, रा. टाकळी बोलवाड, ता. मिरज) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
या ऑपरेशनमध्ये निरीक्षक सोमनाथ वाघ, सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजीत तिप्पे, पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग मुंडे, पूनम मगदूम, अझर मुलानी तसेच प्रवीण यादव, रावसाहेब सुतार, हेमंत ओमासे, शशिकांत जाधव, अमोल ढोले, मिथुन गंगाधर, राजेंद्र बाबर, मधुकर मदवान, भरत पवार, विकास भोसले, सुनंदा लोहार, अफसाना मुलानी, दिपाली माळी, अपर्णा जाधव, दिपाली केंद्रे, वसंत कांबळे, संग्राम पाटील, स्वप्नील भोसले, उमेश राजगे, अनिल खोत, रामचंद्र शिंदे यांनी सहभाग घेतला. या कारवाईबद्दल जिल्ह्याचे नूतन पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी मिरज ग्रामीण पोलिसांचे कौतुक केले. अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणील गिल्डा, सांगली गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे, मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक सोमनाथ वाघ, शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक किरण चौगुले, गांधी चौक पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते.
सिराज उर्फ किरण भोसले याच्याविरुद्ध खून, दरोडा, जबरी चोरी, बलात्कार अशा नऊ गंभीर गुन्ह्यांची नोंद असून कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यातही दरोड्याचा एक गुन्हा दाखल आहे. विश्वनाथ भोसले हा जबरी चोरीच्या गुन्ह्यात, तर क्रांती भोसले हा दरोड्याच्या गुन्ह्यात फरार होता. कोंबिंग ऑपरेशनमुळे हे तिघेही सराईत गुन्हेगार अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकले.


