योगेश रोकडे यांना “राज्यस्तरीय महाराष्ट्र भूषण गौरव पुरस्कार २०२६” प्रदान

0
rokade

मिरज (प्रतिनिधी)
हुतात्मा अपंग बहुउद्देशीय विकास कल्याणकारी संस्था, ओगलेवाडी-कराड (महाराष्ट्र) यांच्या वतीने दिला जाणारा “राज्यस्तरीय महाराष्ट्र भूषण गौरव पुरस्कार २०२६” वितरण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी सांगली येथील मा. योगेश रोकडे यांना “आदर्श जनसंपर्क अधिकारी” या मानाच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.

योगेश रोकडे हे सध्या मातोश्री तानूबाई दगडू खाडे शैक्षणिक संकुल, मिरज येथे कार्यरत असून प्रतिष्ठा न्यूज येथे सहसंपादक म्हणूनही कार्यभार सांभाळत आहेत. सामाजिक क्षेत्रात त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांना हा प्रतिष्ठेचा सन्मान प्रदान करण्यात आला. माजी मुख्यमंत्री पद्मभूषण कै. वसंतदादा पाटील यांच्या स्मरणार्थ आयोजित या सोहळ्यात विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती. समाजोपयोगी कार्य करणाऱ्या अनेक व्यक्तींचा यावेळी गौरव करण्यात आला.

महाराष्ट्र दिनानिमित्त (दि. १ मे २०२६) योजना भवन, कालनगर व्यापारी रोड, सांगली येथे हा सोहळा संपन्न झाला. संस्थेचे अध्यक्ष मा. डॉ. सुनील फडतरे यांच्या हस्ते योगेश रोकडे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. या सन्मानाबद्दल योगेश रोकडे यांचे विविध स्तरांतून अभिनंदन होत असून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *