महापालिकेची सोनखत चोरी मिरज सुधार समितीच्या कार्यकर्त्यांनी रोखली
आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांची गांधाराची भूमिका
मिरज (प्रतिनिधी)
शहरातील मिरज – बेडग रस्त्यावरील कत्तलखाना शेजारी महापालिकेच्या जागेतील सोनखत काही महापालिका आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी संगणमत करून परस्पर विल्हेवाट लावत सोनखत चोरी करण्याचा प्रकार मिरज सुधार समितीने उघडकीस आणला आहे. याबाबत संबंधित आरोग्य विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी मिरज सुधार समितीने केली आहे.
मिरज – बेडग रस्त्यावरील कत्तलखाना शेजारी महापालिकेच्या सुमारे पाच एक्कर जागेत शहरातील मैलामिश्रित गाळ आणून टाकला जातो. यातून खत तयार होते. या खताला सोनखत म्हटले जाते. हा सोनखत टनाला 4 हजार रुपयेला विकला जातो. सदर सोनखत निविदा काढून विक्री करणे आवश्यक आहे. मात्र, मंगळवारी आरोग्य विभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी संगणमत करून किरकोळ पावती करत सोनखतचे परस्पर विल्हेवाट लावून चोरी केली जात असल्याची माहिती मिरज सुधार समितीचे ऍड. ए. ए. काझी, अध्यक्ष नरेश सातपुते, उपाध्यक्ष तौफिक देवगिरी यांना मिळताच त्यांनी घटना ठिकाणी जाऊन आरोग्य विभागाचा भोंगळ कारभाराचा पर्दापाश करत संबंधित आरोग्य विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी मिरज सुधार समितीने केली आहे.
सुमारे 50 लाखांचे सोनखत…
मिरज – बेडग रस्त्यावरील कत्तलखाना शेजारी महापालिकेच्या सुमारे पाच एक्कर जागेत शहरातील मैलामिश्रित गाळ आणून टाकला जातो. यातून सुमारे एक हजार टनाहून अधिक सोनखत आहे. यातून महापालिकेला सुमारे 50 लाखांचे उत्पन्न अपेक्षित आहे.


